बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (ranveer singh) सध्या त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत येत आहे. काही दिवसांपूर्वी रणवीरने न्यूड फोटोशूट करुन त्यातले काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. हे फोटो पाहिल्यावर नेटकऱ्यांनी त्याच्यावर जोरदार टीका केली आहे. इतकंच नाही तर आता रणवीरसोबत त्याच्या आईला आणि बहिणीलादेखील ट्रोल करण्यास सुरुवात झाली आहे.
सध्या सोशल मीडयावर रणवीरच्या आई आणि बहिणीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्या दोघी प्रसिद्ध डिझायनर मनिष मल्होत्राच्या ऑफिसबाहेर पडताना दिसत आहेत. विशेष म्हणजे एकीकडे मुलगा न्यूड फोटोशूट करतोय आणि दुसरीकडे आई-बहीण कपड्यांची खरेदी करतायेत असं म्हणत नेटकऱ्यांनी त्यांनी ट्रोल करण्या सुरुवात केली आहे. हा व्हिडीओ विरल भय्यानी यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रणवीरची आई आणि बहीण मनिष मल्होत्राच्या ऑफिसबाहेर पडत होत्या. या दोघींना पाहिल्यानंतर पापाराझींनी त्यांच्याकडे धाव घेत त्यांचे फोटो काढायला सुरुवात केली. यावेळी रणवीरच्या बहिणीचा अॅटिट्यूड पाहूनही काही जणांनी तिला ट्रोल केलं.
काय म्हणाले ट्रोलर्स?
'रणवीरने कपडे खरेदी करायला मनाई केल्यामुळे दोघी परत जातायेत', असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर, 'आपल्या लाडक्या लेकासाठी कपडे खरेदी करायला जाताय वाटतं?', 'मुलाला कपडे घालायचे नाहीयेत आणि तुम्ही खरेदी करताय', 'मुलासाठी जरा चार कपडे खरेदी करा', अशा कितीतरी कमेंट करत नेटकऱ्यांनी या मायलेकींना ट्रोल केलं आहे.