Join us

सलमानचा मेहूणा आयुष शर्माने खरेदी केली ड्रीम कार; किंमत वाचून थक्क व्हाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 11:18 IST

बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) मेहुणा आयुष शर्मा (Aayush Sharma) सध्या चर्चेत आला आहे.

Aayush Sharma: बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) मेहुणा आयुष शर्मा (Aayush Sharma) सध्या चर्चेत आला आहे. आयुषने 'लव्हरात्री' या सिनेमातून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर अभिनेत्याने सलमान खानसोबत 'अंतिम द फाइनल ट्रुथ' चित्रपटात स्क्रीन शेअर केली. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्याने भलामोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. आयुष त्याच्या अभिनयासह वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत असतो. त्यामुळे चाहते कायमच त्याच्याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असतात. नुकतीच अभिनेत्याने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. 

आयुष शर्माने वर्षाखेरीस त्याची ड्रीम कार खरेदी केली आहे. आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर या आनंदी क्षणांचे फोटो पोस्ट करत अभिनेत्याने ही गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केल्याची पाहायला मिळते. नुकतीच आयुष शर्माने काळ्या रंगाची 'Maserati Grecale' ही आलिशान गाडी घेतली आहे. इंडियन मार्केटमध्ये या गाडीची किंमत जवळपास १ कोटी ७० लाख इतकी आहे. 

दरम्यान, सोशल मीडियावर आयुषने नव्या गाडीसोबत पोज देत काढलेले फोटो पोस्ट केले आहेत. "From Dreams to Driveways..." असं कॅप्शन देत आयुषने नव्या गाडीचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केल्याचे पाहायला मिळत आहेत. त्याची ही पोस्ट पाहून चाहत्यांनी अभिनेत्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, आयुष शर्माचं कार कलेक्शन नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेतं. त्यावरून अभिनेत्याला गाड्यांची प्रचंड आवड असल्याचं कळतंय. मीडिया रिपोर्टनुसार, जीप रुबिकॉन, रेंज रोवर स्पोर्ट, लैंड रोवर डिफेंडर, मिनी कूपर एस आणि किआ कार्निवल लिमोसिन अशा गाड्या त्याच्याकडे आहेत. त्यात आता या नव्या गाडीची भर पडली आहे. 

टॅग्स :आयुष शर्मासलमान खानबॉलिवूडसेलिब्रिटीसोशल मीडिया