Salman Khan Replced By Abhishek Bachchan : बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खान त्याचा आगामी चित्रपट 'सिकंदर'मुळे चर्चेत आहे. ज्याच्या शूटिंगमध्ये सध्या सलमान व्यस्त आहे. अभिनेत्याने त्याच्या आजवरच्या कारकिर्दीत बरेच चित्रपट रिजेक्ट केले आहेत. पण, नुकताच एक चित्रपट सलमानने साईन करूनही त्यामध्ये काम करण्यास नकार दर्शवला. या सिनेमासाठी सलमान खानने दिवसरात्र मेहनत केल्याचं सांगितलं जातंय. अखेरीस सलमानच्या जागी अभिषेक वर्णी लागली.
सगळीकडेच रेमो डिसुझा दिग्दर्शित 'बी हॅप्पी' सिनेमाची चर्चा रंगलेली दिसते आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हा चित्रपट नृत्य कौशल्यावर आधारित होता. शिवाय 'डान्सिंग डॅड' हे नाव बदलून 'बी हॅप्पी' असं करण्यात आलं. या चित्रपटाचं कथानक एका बाप-लेकीच्या आयुष्यावर आधरित आहे. सलमान खानला चित्रपटामध्ये वडिलांच्या भूमिकेसाठी विचारणा केली असल्याचं म्हटलं जात आहे.
सलमान खानने दिवसरात्र केली होती मेहनत-
या चित्रपटासाठी सलमानने प्रचंड मेहनत केली होती असं सांगण्यात येत आहे. त्यासाठी अभिनेता स्वत: च्या फिटनेसकडे विशेष लक्ष देत होता तर त्याने डान्सिंग ट्रेंनिंग देखील सुरु केली. त्यादरम्यान, सलमानला एका चित्रपटाची ऑफर आली. त्यासाठी अभिनेत्याने पहिल्यांदा ऑफर झालेल्या त्या चित्रपटाचं शूट पूर्ण करण्यास प्राधान्य दिलं. तो चित्रपट म्हणजे 'रेस- ३' होता. या चित्रपटासाठी 'डान्सिंग डॅड' चं शूट थांबवण्यात आलं.
सलमानच्या चित्रपटात अभिषेक बच्चनची वर्णी-
मीडिया रिपोर्टनुसार, 'रेस- ३' च्या शूटिंगनंतर दिग्दर्शक रेमो डिसुझा यांनी गृहित धरलं की आता सलमान आपला पूर्ण वेळ या चित्रपटाला देईल. पण, प्रत्यक्षात असं घडलंच नाही. काही कारणामुळे अभिनेत्याने 'बी हॅप्पी' मध्ये काम करण्यास नकार दिला.
सलमानच्या निर्णयानंतर दिग्दर्शकाने या चित्रपटात अभिषेक बच्चनला कास्ट केलं. अशातच चित्रपटाचं 'डान्सिंग डॅड' हे नाव बदलून 'बी हॅप्पी' असं ठेवण्यात आलं.