Join us

तब्बल २० वर्षांनी येणार शाहरुख-सुष्मिताच्या 'मैं हू ना' चा सीक्वेल; गाण्यांनी प्रेक्षकांना लावलेलं वेड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 10:45 IST

२००४ मध्ये फराह खान (Farah Khan) दिग्दर्शित 'मैं हू ना'  चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

Main Hoon Na Sequel: २००४ मध्ये फराह खान (Farah Khan) दिग्दर्शित 'मैं हू ना'  चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात शाहरुख खान(Shahrukh Khan), सुष्मिता सेन (Sushmita Sen) व सुनील शेट्टी अशी तगडी स्टारकास्ट होती. त्या काळी हा चित्रपट प्रचंड गाजला.या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली होती. सिनेमाचं कथानक आणि त्यातील गाण्यांनी सिनेरसिकांना अक्षरश: वेड लावलं होत. आपल्या भावाच्या शोधात निघालेला मेजर राम महाविद्यालयात शिक्षण घेणारा पण उनाड आयुष्य जगणारा त्याचा भाऊ लक्ष्मण (लकी). तसेच  कॉलेजच्या कॅम्पसमध्ये सर्वांची लाडकी असणारी संजना बक्षी यांच्याभोवती हे कथानक फिरत असतं. जवळपास २१ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर बॉक्स ऑफिसवर गाजवलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. दरम्यान, या चित्रपटासंदर्भात एक मोठी अपडेट समोर येत आहे. लवकरच 'मैं हू ना' चित्रपटाचा सिक्वेल येणार असल्याचं म्हटलं जात आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, फराह खान आणि  शाहरुख खानच्या रेड चिलीज प्रोडक्शन टीमसह सिनेमाच्या स्क्रीप्टवर काम करण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे किगं खानचे चाहते सुद्धा प्रचंड खुश आहेत. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, 'मैं हू ना-२' साठी फराह खानने एक खास स्टोरी लिहिली आहे. त्याला शाहरुखची देखील पसंती मिळाली आहे. मात्र, यावर शाहरुख किंवा फराह खान यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. 

'मैं हू ना' च्या पहिल्या भागातील दमदार कथेने आणि कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. या चित्रपटात अभिनेता शाहरुख खानसह झायेद खान, अमृता राव, सुष्मिता सेन, सुनील शेट्टी, सतीश शाह, बिंदू, बोमन इराणी, कबीर बेदी, नसीरुद्दीन शाह आणि किरण खैर हे कलाकार या  महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट त्यावेळी सुपरहिट ठरला.

टॅग्स :शाहरुख खानफराह खानसुश्मिता सेनसुनील शेट्टीबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा