Param Sundari Movie : नॉर्थचा स्वॅगच आणि साउथची ग्रेस अशा भिन्न प्रदेशातील परम आणि सुंदरीची अनोखी प्रेम कहाणी प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पाहता येणार आहे. बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) यांची जोडी आता नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'Maddocks' फिल्म निर्मित 'परम-सुंदरी' या रोम-कॉम चित्रपटात सिद्धार्थ-जान्हवीची केमिस्ट्री सिनेरसिकांना अनुभवता येणार आहे. नुकताच या सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलंय.
दरम्यान, सोशल मीडियावर 'Maddocks' फिल्म्सकडून या नव्या सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. शिवाय या चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. येत्या २५ जुलै २०२५ मध्ये हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.
'परम-सुंदरी' या चित्रपटाचं दिग्दर्शन तुषार जलोटा करणार आहेत. याआधी त्यांनी 'दसवी' या हिंदी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 'परम-सुंदरी' हा सिनेमा एक रोम-कॉम चित्रपट असून दोन विभिन्न प्रदेश, संस्कारात वाढलेले परम आणि सुंदरी यांचा एकमेकांवर जीव जडतो आणि तिथून त्यांच्या प्रेमकहाणीला सुरुवात होते. असं या चित्रपटाचं कथानक आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा परम नावाच्या एका श्रीमंत उद्योगपतीच्या भूमिकेते दिसणार आहे. केरळमधील बिनधास्त आणि मॉर्डन मुलीच्या भूमिकेत जान्हवी कपूर पाहायला मिळणार आहे. सुंदरी असं तिच्या पात्राचं नाव आहे.