Join us

'धर्म, आस्था अन्...', अंगावर काटा आणणारा 'केसरी वीर' सिनेमाचा धमाकेदार टीझर रिलीज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 17:54 IST

'केसरी वीर: लिजेंड ऑफ सोमनाथ' सिनेमाचा याचा जबरदस्त टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

Kesari Veer Teaser: अभिनेता सूरज पंचोली (Sooraj pancholi, सुनील शेट्टी (Sunil Shetty) आणि विवेक ओबेरॉय स्टारर 'केसरी वीर: लिजेंड ऑफ सोमनाथ' सिनेमाचा याचा जबरदस्त टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेता सूरज पंचोली प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. याशिवाय या चित्रपटातून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आकांक्षा शर्मा डेब्यू करते आहे. 'केसरी वीर'मध्ये ती सूरज पंचोलीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. नुकताच या सिनेमाचा जबरदस्त टीझर रिलीज करण्यात आला आहे. हा टीझर पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. 

सोशल मीडियावर 'Panoram Studios'च्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाउंटवरून या चित्रपटाचा टीझर शेअर करण्यात आला आहे. हा चित्रपट एक बायोपिक असून गुजरातमधील प्रसिद्ध सोमनाथ मंदिरात झालेल्या युद्धाभोवती फिरतो. "केसरी वीर - धर्म, आस्था,और सोमनाथ की पवित्र भूमि की रक्षा का संग्राम..., असं कॅप्शन देत केसरी वीरचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. दरम्यान, १४ मार्च २०२५ ला हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.

'केसरी वीर: लिजेंड ऑफ सोमनाथ' चित्रपटाचं दिग्दर्शन प्रिन्स धीमान यांनी केलं आहे. या चित्रपटात अभिनेता सूरज पंचोली प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. अगदी काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आलं होतं. तेव्हापासून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली होती. परंतु, आता 'केसरी वीर: लिजेंड ऑफ सोमनाथ'  च्या जबरदस्त टीझरमुळे प्रेक्षकांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

टॅग्स :सुरज पांचोलीसुनील शेट्टीविवेक ऑबेरॉयबॉलिवूडसिनेमा