Join us

'१० रुपयाची प्लेट...' बॉलिवूड अभिनेता वरुण धवनचा नाश्ता बघून नेटकरी असं का म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 12:43 PM

बॉलिवूड अभिनेत्री किंवा अभिनेते फिट राहण्यासाठी काय खातात, कोणतं डाएट फॉलो करतात? याबाबतीत अनेकांना उत्सुकता असते.

Varun Dhawan Video : बॉलिवूड अभिनेत्री किंवा अभिनेते फिट राहण्यासाठी काय खातात, कोणतं डाएट फॉलो करतात? याबाबतीत अनेकांना उत्सुकता असतेच. फिटनेस आणि सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी सेलिब्रिटी डाएटला काटेकोरपणे फॉलो करतात. अभिनेत्री त्यांच्या आहारतज्ञांनी दिलेल्या डाएट चार्टनुसार ब्रेकफास्ट, लंच, डिनर करतात. पण, याला सोशल मीडियावर अभिनेता वरूण धवनचा व्हायरल होणारा एक व्हिडीओ अपवाद ठरतोय . 

नुकताच वरूण धवनचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता सकाळच्या नाश्त्यामध्ये काय खातो हे स्पष्टपणे दिसतंय. बॉलिवूडसेलिब्रिटी कोणता पदार्थ किती प्रमाणावर खावा, मोजमाप करून त्या अन्नाचे सेवन करतात. डाएटमध्ये ब्रेकफास्ट महत्वाचा असतो असं म्हटलं जातं पण वरुण धवनच्या नाश्त्यामधील पदार्थ पाहून नेटकरी देखील चक्रावले आहेत. 

' Bollywood Chronicle' या इन्स्टाग्राम अकाउंटवर अभिनेत्याचा हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. वरुण धवनच्या या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी देखील व्यक्त होताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये एका प्लेटमध्ये बारीक चिरलेला कांदा आणि चमचा ठेवला आहे. तर दुसऱ्या प्लेटमध्ये पोहे दिसताय. हा व्हिडीओ पाहिल्यावर कोणालाही अंदाज येईल की वरुण पोह्यासोंबत चिरलेला कांदा मिक्स करून खाणं पसंत करतो. अभिनेत्याचा हा व्हिडीओ पाहून एका नेटकऱ्याने १० रुपयाची प्लेट अशी कमेंट करत इतरांचं ही लक्ष वेधलं आहे. 

वर्कफ्रंट-

वरुण धवन आजच्या पिढीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सध्या वरुण धवन हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकतेच वरुण धवन बाबा झाला आहे. वरुणची पत्नी नताशा हिने एका मुलीला जन्म दिला. वरुण शेवटचा 'बवाल' या चित्रपटात दिसला होता. त्यानंतर बऱ्याचा काळानंतर वरुण आता 'स्त्री २' चित्रपटात त्याची झलक पाहायला मिळाली. त्यामुळे वरुण धवनच्या नवीन चित्रपटासाठी चाहते उत्सुक आहेत.

टॅग्स :वरूण धवनबॉलिवूडसेलिब्रिटीसोशल मीडियासोशल व्हायरल