Join us

अभिनेता विवेक ओबेरॉय सहकुटुंब पोहोचला महाकुंभमेळ्यात; त्रिवेणी संगमावर केलं पवित्र स्नान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 16:56 IST

उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेला महाकुंभमेळा आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.

Vivek Oberoi: उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेला महाकुंभमेळा आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या महाकुंभमेळ्यामध्ये संत, महंत ते मोठमोठ्या राजकीय नेत्यांपर्यंत अनेकांनी भेट देऊन त्रिवेणी संगमामध्ये पवित्र स्नान केलं आहे. दरम्यान, हा मेळा १३ जानेवारीपासून सुरू होऊन २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. १४४ वर्षांनंतर होणाऱ्या या महाकुंभमेळ्याला विशेष महत्व आहे. अशातच लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय सहकुंटुंब (Vivek Oberoi) या भव्य सोहळ्यासाठी प्रयागराजमध्ये पोहोचला आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत याची खास झलक दाखवली आहे.

विवेक ओबेरॉयने महाकुंभमेळ्यात परमार्थ निकेतनचे मुख्य स्वामी चिदानंद आणि साध्वी भगवती सरस्वती यांची भेट सुद्धा घेतल्याची पाहायला मिळतेय. याचे फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यादरम्यान अभिनेत्यासोबत त्याची पत्नी प्रियंका तसेच आई आणि दोन्ही मुलांसह महाकुंभमेळ्यात पोहोचून त्रिवेणी संगमात स्नान केलं. यावेळी विवेक ओबेरॉयने माध्यमांसोबत खास बातचीत केली. त्यादरम्यान अभिनेता म्हणाला, “महाकुंभमेळ्यात आल्याने मला आध्यात्मिक शांतीचा अनुभव मिळाला. हे ठिकाण सकारात्मक उर्जेने परिपूर्ण आहे, शिवाय येथील अध्यात्म जीवनाला नवी दिशा देतं."अशी प्रतिक्रिया त्याने दिली.

विवेक ओबेरॉयच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर लवकरच अभिनेता 'केसरी वीर: लिजेंड ऑफ सोमनाथ'या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला. त्याला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते आहे.

टॅग्स :विवेक ऑबेरॉयकुंभ मेळाबॉलिवूडसेलिब्रिटी