Masti -4 : प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक इंद्र कुमार यांची फ्रॅंचायझी असलेल्या 'मस्ती' चित्रपटाच्या चौथ्या भागाची घोषणा करण्यात आली आहे. अभिनेता विवेक ओबेरॉय (Viviek Oberoi), रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि आफताब शिवदासनी (Aftab Shivdasani) यांची मुख्य भूमिका असलेला 'मस्ती' हा चित्रपट त्यावेळी प्रचंड गाजला होता. 'मस्ती'च्या यशानंतर 'ग्रॅंड मस्ती', 'ग्रेट ग्रॅंड मस्ती' असे सीक्वेलही प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्यानंतर 'मस्ती' चित्रपटाच्या चौथ्या भागाची घोषणा करण्यात आली आहे. मिलाप झवेरी या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असल्याचं कळतंय.
सोशल मीडियावर या चित्रपटातील कलाकारांनीही पोस्ट शेअर करत चित्रपटाबद्दल संकेत दिले आहे. अभिनेता विवेक ओबेरॉयने इन्स्टाग्रामवर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केल्याचा पाहायला मिळतोय. या व्हिडीओच्या कॅप्शन नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक मिलाप झवेरी आणि रितेश देशमुख मस्तीखोर अंदाजात दिसत आहेत. विवेक ओबेरॉयने 'मस्ती-४' च्या सेटवरील फोटो शेअर करत लिहिलंय, 'मस्ती-४' आता एक प्रेमकथा असून 'ब्रोमान्स' सुरू झाला आहे. पहिल्या चित्रपटानंतर २० वर्षांचा वेडपणा! माफ करा, मी लॉन्चिंला येऊ शकलो नाही. लवकरच शूटिंगला भेटू."
त्याचबरोबर अभिनेता आफताब शिवदासनीने सुद्धा सोशल मीडियावर 'मस्ती-४' च्या सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत. आफताबने शेअर केलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "वेडेपणाला सुरूवात झाली आहे, आतापर्यंतचा सर्वात मजेशीर प्रवास # 'मस्ती-४'." या पहिल्या फोटोमध्ये अभिनेता हातात क्लिपबोर्ड पकडून उभा असल्याचा दिसतो आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये रितेश देशमुख आणि दिग्दर्शक मिलाप झवेरी एकत्र पाहायला मिळत आहेत. शिवाय या फोटोत अभिनेते जितेंद्र देखील दिसत आहेत.