Join us

"हिंदू पुरुषांनीही..."! मोहरमप्रसंगी रक्ताने माखलेल्या मुस्लीम बांधवांचा VIDEO शेअर करत कंगनाचं ट्विट, लोक भडकले 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 7:34 PM

हा व्हिडिओ शेअर करत कंगनाने असे काही लिहिले आहे की, ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. युजर्स कंगनाच्या या ट्विटवर सातत्याने रिअ‍ॅक्ट होत आहेत...

भाजप खासदार तथा बॉलीवुड अ‍ॅक्ट्रेस कंगना रणौतने (Kangana Ranaut)  सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर मोहरमशी संबंधित एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात मस्लीम बंधूंच्या हातात तलवारी दिसत आहेत आणि ते रक्ताने माखलेले आहेत. हा व्हिडिओ शेअर करत कंगनाने असे काही लिहिले आहे की, ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. युजर्स कंगनाच्या या ट्विटवर सातत्याने रिअ‍ॅक्ट होत आहेत.

काय आहे ट्विट? -कंगनाने व्हिडिओ शेअर करत ट्विट केले आहे की, "हे विचित्र आणि भीतीदायक आहे. पण, अशा जगात टिकून राहण्यासाठी हिंदू पुरुषांनीही काही अनिवार्य लढाऊ प्रशिक्षण घ्यायला हवे? भोवतालची परिस्थिती पाहता, रक्त  गरम ठेवण्यास काही हरकतही नाही... आहे का?'

कंगना रनौतच्या या व्हिडिओवर यूजर्स भडकले आहेत. एक यूजरने तर हिमाचल पोलिसांना टॅग करत लिहिले आहे, 'ही महिला हिंदूंना भडकावत आहे. त्यांना रक्त गरम ठेवायला आणि हिंसक व्हायला सांगत आहे.' दुसऱ्याने लिहिले आहे, 'हे योग्य नाही. पण त्यांना इस्लाममध्ये असे करावे लागते.' आणखी एकाने लिहिले आहे, 'खरो खरच हे दृष्य दुःखी करणारे आणि भीतीदायक आहे.' 

कंगनाच्या या ट्विटनंतर, काही लोक हिंदूंना भडकावण्याचा आरोप करत आहेत. तर काही लोक समर्थन करत आहेत. एकाने लिहिले 'कुणी सहमत असो वा नसो, ते त्यांच्या धर्माचे पालन करत आहेत आणि यापासून त्यांना कुणीही रोखू शकत नाही.' तर आणखी एकाने लिहिले आहे, 'आपले रक्त गरम ठेवा.' आणखी एकाने लिहिले, 'तयार राहण्यात काहीच हरकत नाही.'

टॅग्स :कंगना राणौतबॉलिवूडमुहर्रम