Join us

Alia Bhatt : मुलगी झाली आलिया-रणबीरला पण करण जोहर का होतोय ट्रोल? ट्विटरवर मीम्सचा पूर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2022 5:15 PM

Alia Bhatt Welcome A Baby Girl Karan Johar Funny Memes : आलियाच्या मुलीच्या जन्मानंतर एकीकडे कपूर कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय, दुसरीकडे करण जोहर सोशल मीडियावर ट्रोल होतोय. ट्विटरवर मीम्सचा जणू पूर आला आहे.

आलिया भट (Alia Bhatt ) व रणबीर कपूर हे बॉलिवूडचं क्यूट कपल. आज रविवारी हे क्यूट कपल आई-बाबा झालं. आलियाने एका गोंडस कन्येला जन्म दिला. आलियाच्या मुलीच्या जन्मानंतर एकीकडे कपूर कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय, दुसरीकडे करण जोहर ( Karan Johar) सोशल मीडियावर ट्रोल होतोय. ट्विटरवर मीम्सचा जणू पूर आला आहे.आज सकाळी 7.30 वाजता आलियाला प्रसूतीसाठी रूग्णालयात भरती करण्यात आलं आणि यानंतर काहीच तासांत आलियाने एका गोंडस मुलीला जन्म दिल्याची बातमी आली. यानंतर सगळीकडे आलिया व रणबीरच्या मुलीचीच चर्चा रंगली. पण याचदरम्यान सोशल मीडियावर अचानक करण जोहर ट्रेंड करू लागला. नेटकऱ्यांनी त्याची मजा घ्यायला सुरूवात केली. करण जोहरला ‘स्टुडंट ऑफ द इअर 9’साठी हिरोईन मिळाली, असं म्हणत अनेकांनी करणची खिल्ली उडवायला सुरूवात केली.

स्टारकिड्सला लॉन्च करण्यात करण जोहर आघाडीवर आहे. आलियाला सुद्धा करणनेच लॉन्च केलं होतं. करणच्या ‘स्टुडंट ऑफ द इअर’मधून आलियाचा डेब्यू झाला होता. आता आलियाच्या लेकीलाही करण जोहरच लॉन्च करणार, असं म्हणत नेटकऱ्यांनी एकापेक्षा एक मजेदार मीम्स शेअर केलेत. हे भन्नाट मीम्स पाहून तुम्हालाही हसू आवणार नाही.

हे मीम्स तुम्ही खाली बघू शकता...

करण जोहर आलियाला मुलगी मानतो. आलिया प्रेग्नंट आहे हे कळल्यावर त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. एका मुलाखतीत त्याने हा किस्सा सांगितला होता. त्यादिवशी माझा बॅड हेअर डे होता आणि मी हुडी घालून बसलो होतो. आलियाने मला त्याचदिवशी गुडन्यूज दिली. ते ऐकून माझ्या डोळ्यांत अश्रू होते. आलिया आई बनणार, यावर विश्वास बसत नव्हता. ती भावना फार वेगळी होती, असं तो म्हणाला होता.  

टॅग्स :आलिया भटकरण जोहरमिम्सरणबीर कपूरसोशल मीडिया