Ananya Panday : अभिनेत्री अनन्या पांडेने 'कॉल मी बे'मधून वेब सीरिजच्या दुनियेत प्रवेश केला. ही अभिनेत्री तिच्या पदार्पणाच्या मालिकेपासूनच लोकप्रिय झाली आणि तिला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळालं. सध्या अनन्या पांडे तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त असल्याची पाहायला मिळते. शिवाय अनन्या या वेब सीरीजमुळे चर्चेत आली आहे. लवकरच ती विक्रमादित्य मोटवानी यांच्या CTRL या चित्रपटामध्ये दिसणार आहे. अशातच अभिनेत्री सध्या वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती देताना दिसते आहे.
नुकतीच अनन्या पांडेने 'गलाटा इंडिया'ला एक मुलाखत दिली. या मुलाखती दरम्यान अभिनेत्रीने तिच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा खुलासा केला. या मुलाखतीत अनन्या म्हणाली, "प्रेमभंग झाल्यानंतर त्यातून सावरणं गरजेचं असतं. कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नाही आणि माणूस त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग काढतोच". दरम्यान या मुलाखतीत अनन्याने तिचा ब्रेकअप झाल्यानंतर एक्स बॉयफ्रेंडचे फोटो जाळल्याचा खुलासाही केला. मीडिया रिपोर्टनुसार, अनन्या आणि तिच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वयात १३ वर्षांचं अंतर होतं, असं सांगितलं जातं.
एक्स बॉयफ्रेंडचे जाळले फोटो-
या मुलाखतीत अभिनेत्रीला ब्रेकअप झाल्यानंतर तू एक्स बॉयफ्रेंडचे फोटो जाळले होते का? असा प्रश्न विचारला गेला, त्यावर उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली, "तेव्हा मी एक्स बॉयफ्रेंडचे फोटो जाळले होते, परंतु मी आता तसं काही करत नाही. या जगात मी एकटीनेच हे केलंय असं काही नाही. बरेच लोक विचारांच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी असं करतात. राग बाहेर काढण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे".
CTRLच्या ट्रेलरला मिळतेय पसंती-
विक्रमादित्य मोटवाने यांचा सायबर-थ्रिलर CTRL लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला असून त्याला खूप सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. ट्रेलरमध्ये अनन्या पांडे नाइला अवस्थीच्या भूमिकेत दाखवण्यात आली आहे आणि विहान सामत जो मस्करेन्हासच्या भूमिकेत दाखवण्यात आला आहे. हे जोडपे कंटेंट मेकिंग करतात आणि इंटरनेटवर त्यांचे बरेच फॉलोअर्स आहेत. पण कथेत ट्विस्ट येतो जेव्हा दोघांचे ब्रेकअप होते.