मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूँ या चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री अंतरा माळी बऱ्याच कालावधीपासून बॉलिवूडमधून गायब आहे. ती सध्या कुठे आहे आणि काय करते आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे.
अभिनेत्री अंतरा माळी हिला बॉलिवूडमध्ये अपयश आले. तिने एकही हिट चित्रपट दिला नाही. १९९८ साली ढुंढते रह जाओगे’ या चित्रपटातून अंतराने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०००च्या सुरूवातीला राम गोपाल वर्माची निळ्या डोळ्यांची अभिनेत्री म्हणून अंतरा माळी ओळखली जायची.
अंतरा प्रसिद्ध छायाचित्रकार जगदीश माळी यांची लेक आहे. अंतराने सुरुवातीला तेलगू चित्रपटात काम केले. काही कालावधीनंतर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले पण तिला यश मिळू शकले नाही. २०१० मध्ये अंतरा शेवटची ‘अॅन्ड वन्स अगेन’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली.
२०१२ मध्ये अंतराने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात मुलीला जन्म दिला. सध्या अंतरा आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहे.