असिनने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले. क्वीन ऑफ कॉलिवूडच्या नावाने असिनला ओळखले जाते. आमिर खानसोबत असिनने 'गजनी'मध्ये काम केले होते. या सिनेमानंतर तिला सलमान खान आणि अक्षय कुमारसोबत काम करण्याची संधी मिळाली. खरं म्हणजे असिनसाठी 2012 हे वर्ष यश घेऊन आलं. 100 कोटींचा तिकीट खिडकीवर बिझनेस करणा-या सिनेमाशी तिचं नाव जोडलं गेलं. आधी हाऊसफुल्लमध्ये अक्षयसह तिनं कॉमेडीचा तडका लावला.
त्यानंतर असिनन खिलाडी ७८६ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केले होते. याच सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान अक्षय आणि असिनची खूप चांगली मैत्री जमली होती. असिन 2015 मध्ये आलेल्या ऑल इज वेल या सिनेमात अभिषेक बच्चनसोबत शेवटची दिसली होती. त्यानंतर मात्र तिने इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला आणि राहुल शर्मासोबत संसार थाटला. असिन आपल्या करिअरची सुरुवात दक्षिणात्य सिनेमातून केली होती.
9 जानेवारी 2016ला दिल्लीमध्ये मायक्रोमॅक्स कंपनीचा को-फाऊंडर असलेल्या राहुल शर्मासोबत विवाहबंधनात अडकत असिनने सगळ्यांना आश्चर्याया धक्का दिला होता. असिनने आधी राहुलसोबत चर्चमध्ये आणि नंतर हिंदु पद्धतीनुसार लग्न केले होते. राहुल आणि असिनची ओळख अक्षय कुमारने करून दिली होती.
लग्नानंतर सिनेमात काम न करण्याचा निर्णय असीनने घेतला होता.आपल्या या निर्णयावर ती आजही ठाम आहे. आपल्या चाहत्यांसाठी आणि मीडियासाठी इंस्टाग्रामवर तिने याबाबतचा खुलासा केला होता. लग्नापूर्वी मी माझ्या सगळ्या प्रोफेशनल कमिटमेंट पूर्ण केल्या होत्या आणि आता कुठलाही प्रोजेक्ट स्वीकारणार नाहीय, असे तिने म्हटले होते. करिअरमधून ब्रेक घेत ती आता संसारात रमली. असीनला एक मुलगी आहे. सध्या ती तिचा सगळा वेळ तिच्या कुटुंबासह एन्जॉय करतेय.