Bollywood : मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांचं खरं आयुष्य अजबच असतं. त्यांची पर्सनल लाईफ चर्चेचा विषय असते. अनेक कलाकारांच्या खऱ्या आयुष्यात मोठी वादळं येतात आणि त्यांचं आयुष्य चव्हाट्यावर येतं. ८० च्या काळात हिंदी सिनेमांमध्ये खलनायिका म्हणून 'मोना डार्लिंग' म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री 'बिंदू' (Bindu) खऱ्या आयुष्यात अनेक कठीण परिस्थितीतून गेली आहे.
बिंदू यांचा जन्म गुजराती कुटुंबात झाला. 1962 मध्ये त्यांनी 'अनपढ' सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले.सासू-नणंदच्या रुपात त्यांनी अनेक खलनायिकेच्या भूमिका केल्या. त्यांचं करिअर सुरळीत सुरु होतं मात्र पर्सनल लाईफमध्ये त्यांनी अनेक उतार चढाव बघितले. त्यांनी कधी आई होण्याचं सुख मिळालं नाही याची त्यांना कायम खंत वाटली.
बिंदू वयाच्या १५ व्या वर्षीच त्यांचे शेजारी असलेले चंपकलाल झवेरी यांच्या प्रेमात पडल्या. तर वयाच्या १८ वर्षी त्यांनी लग्न केलं. चंपकलाल बिंदू यांच्याहून ४ वर्षांनी मोठे होते. सुरुवातीला दोघांच्या लग्नाला कुटुंबाने विरोध केला होता. मात्र अखेर त्यांचं लग्न झालंच. यानंतर 1977 ते 1980 हा काळ त्यांच्यासाठी फारच कठीण गेला.
त्यांनी एका मुलाखतीत सांगितले, ' लग्नानंतर मी गरोदर राहिले. खूप आनंदाचं वातावरण होतं. तीन महिने झाल्यानंतर मी कामही करणं बंद केलं होतं. मात्र सातव्या माझा गर्भपात झाला. डोहाळजेवणाचं आयोजन केलं होतं त्याच्या आदल्याच दिवशी आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. मी अक्षरश: कोसळले होते. पण कदाचित तेच माझ्या नशिबात लिहिलं होतं. यानंतर ५ महिन्यांनी मी पुन्हा काम करायला सुरुवात केली. '