Join us

हिंदी येत नसल्याने बॉलिवूडमध्ये हिणवलं गेलं; पण भाईजानचा एक चित्रपट अन् अभिनेत्रीचं नशीबच बदललं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2024 1:36 PM

बॉलिवूडची प्रसिद्ध बेली डांसर नोरा फतेही या नावाची जगभर ख्याती आहे.

Nora Fatehi birthday :बॉलिवूडची प्रसिद्ध बेली डांसर नोरा फतेही या नावाची जगभर ख्याती आहे. आपल्या सौंदर्याने आणि हटके डान्स मुव्हने तिने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. अभिनेत्री  नोरा फतेही हिंदी, तमिळ आणि तेलगू यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकली असली तरी तिला खरी ओळख तिच्या डान्समुळे मिळाली. ‘बिग बॉस सीझन- ९ आणि ‘झलक दिखला जा’ यांसारख्या रिॲलिटी शोमध्ये ती  स्पर्धक राहिली आहे. तसेच ‘सत्यमेव जयते’ चित्रपटातील ‘दिलबर’ या गाण्याने तिने अनेकांची मने जिंकली. पण नोराचा इथपर्यंतचा प्रवास फारसा सोपा नव्हता. मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर तिने स्वत: ला सिद्ध केलंय. आज नोरा फतेही तिचा ३२ वा वाढदिवस साजरा करतेय. त्यानिमित्ताने तिच्या सिनेसृष्टीतील प्रवासाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. 

गेल्या कित्येक वर्षांपासून नोरा प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आपल्या मेहनतीच्या जोरावर तिने हा पल्ला गाठला आहे. केवळ सौंदर्यच नाही तर तिच्या नृत्यकौशल्याने तिने अनेकांना वेड लावलंय. एका मुलाखती दरम्यान अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील काही अज्ञात गोष्टींबद्दल खुलासा केल्याचे पाहायला मिळाले. पण नोरा जेव्हा भारतात आली तेव्हा तिच्या तिच्याकडे फक्त ५ हजार रुपये होते. तिला ना हिंदी येत होती ना हा देश तिचा होता! पण तिने प्रत्येक आव्हानांचा धैर्याने सामना केला. त्यावेळी तिला असंख्य समस्यांचा सामना करावा लागला आणि सर्वात मोठी समस्या म्हणजे भाषेची होती. नोराला हिंदी बोलता येत नसल्याने अनेकदा तिची खिल्ली उडवण्यात आली, असं ती म्हणते. 

मुळची कॅनडा येथील असल्याने तिला मुंबईत स्वत: चं स्थान निर्माण करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. पण तिला बॉलीवूडमध्ये काहीतरी करायचं होतं, म्हणून कुटुंबाशी वाद घालून ती भारतात आली. पण तिच्या या संपूर्ण प्रवासात तिला हिंदी बोलता येत नसल्याने असंख्य अडणींचा सामना करावा लागला.अशा परिस्थितीवर  मात करत तिने इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केली. 

एकवेळ अशी होती ज्या क्षणी नोरा पूर्णपणे तुटली होती. हाती काम नसल्याने ती प्रचंड हताश झाली होती. त्यामुळे मायदेशी परतण्याचा निर्णयही तिने घेतला होता. पण एक चमत्कार घडला आणि ती थांबली. नोराला सलमान खानच्या 'भारत' या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर तिला कधीच मागे वळून पाहावे लागले नाही.

टॅग्स :नोरा फतेहीबॉलिवूड