कोरोना व्हायरसच्या काळात बऱ्याच कालावधीपासून सर्व जण लॉकडाउनमुळे आपापल्या घरात कैद होते. अशा काळात बॉलिवूडचे बरेच जुने किस्से ऐकायला व वाचायला मिळाला. तसाच एक किस्सा बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांचाही व्हायरल होताना दिसला. हा किस्सा आहे रोटी कपडा और मकान चित्रपटाचा. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मौसमी चॅटर्जी प्रेग्नेंट होत्या आणि त्यावेळी बलात्काराचा सीन शूट केला होता. याबद्दलचा खुलासा खुद्द त्यांनीच एका मुलाखतीत केला होता.मौसमी यांनी प्रसिद्ध गायक हेमंत कुमार यांचा मुलगा जयंत यांच्यासोबत लग्न केले आहे. मौसमी आपल्या कुटुंबीयांसोबत कोलकातामध्ये राहतात. 1974 साली रोटी कपडा और मकान सिनेमाच्या शूटिंगदरम्यान मौसमी चॅटर्जी प्रेग्नेंट होत्या. या चित्रपटात बलात्काराचा सीन चित्रीत करायचा होता. तेव्हा माझे केस फार लांब होते. शूटिंगवेळी माझ्या अंगावर पीठ पडले आणि घामाने ते पूर्ण चिटकले. स्वतःची अशी स्थिती पाहून मला फार रडू आले. मौसमी यांनी या शूटबद्दल सांगितले की, त्यावेळी मी प्रेग्नेंट होती आणि खाली पडल्यामुळे ब्लिडिंग झाले होते. मला लगेच हॉस्पिटलला नेले. नशीबाने माझ्या बाळाला काहीच झाले नव्हते.
मौसमी चॅटर्जीने 1967 साली बंगाली दिग्दर्शक तरुण मजुमदार यांच्या 'बालिका वधू' या चित्रपटातून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. त्यानंतर 1972 मध्ये रिलीज झालेल्या 'अनुराग' या सिनेमाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले.
'कच्चे धागे', 'जहरीला इंसान', 'स्वर्ग नरक', 'फूलखिले हैं गुलशन गुलशन', 'मांग भरो सजना', 'दासी', 'अंगूर', 'घर एक मंदिर', 'जल्लाद' हे त्यांचे काही निवडक गाजलेले सिनेमे आहेत.
मौसमी आणि विनोद मेहरा यांच्या जोडीला प्रेक्षकांनी विशेष पसंत केले. याशिवाय जितेंद्र, संजीव कुमार, राजेश खन्ना, शशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबतही मौसमी यांनी काम केले.