नेहमीच कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावरून वादात असणाऱ्या कंगना रणौतने (Kangana Ranaut) काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृषी कायदे (Farm Laws) मागे घेण्याच्या निर्णयावर भाष्य करताना, हा निर्णय दुःखद आणि लज्जास्पद असल्याचे म्हटले होते. तसेच देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे कौतुक केले आहे. कंगना म्हणाली, आज भलेही खलिस्तानी दहशतवादी सरकारचे हात मुरडत असोत, पण एका महिलेला विसरू नका. एकमेव महिला पंतप्रधानाने यांना आपल्या चपलेखाली चिरडले होते.
फेसबूक पोस्टमध्ये काय म्हणते कंगना ?कंगनाने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये इंदिरा गांधी यांचा फोटो शेअर करत लिहिले,''खालिस्तानी दहशतवादी आज भलेही सरकारचा हात मुरडत असतील... पण त्या महिलेला विसरू नका… एकमेव महिला पंतप्रधानाने यांना आपल्या चपलेखाली चिरडले होते… त्यांनी या देशाला कितीही त्रास दिलेला असो… त्यांनी आपल्या जीवाची परवा न करता त्यांना मच्छरासारखे चिरडले होते... पण देशाचे तुकडे होऊ दिले नाही… त्यांच्या मृत्युनंतर आजही त्यांच्या नावाने हे लटलट कापतात… यांना तसाच गुरू हवा.''
कंगनाची पोस्ट -
तर हाही ‘जिहादी’ देश -पंतप्रधान मोदींनी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर, काहीच क्षणातच कंगनाने एक इन्स्टास्टोरी शेअर केली. यात तिने मोदींच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. "संसदेत निवडून दिलेल्या सरकारऐवजी सस्त्यावर बसणारे लोक कायदे बनवणार असतील तर, हा सुद्धा ‘जिहादी’ देश आहे. ज्यांना हे हवे आहे, त्यांचे अभिनंदन,’" अशा आशयाची इन्स्टा स्टोरी कंगनाने शेअर केली होती.