'भूल भुलैय्या-३' व 'सिंघम अगेन' क्लॅशवर पहिल्यांदाच व्यक्त झाली माधुरी दीक्षित; म्हणाली-"चित्रपट चालले नाहीत तर..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 04:17 PM2024-11-21T16:17:26+5:302024-11-21T16:21:27+5:30

हिंदी सिनेसृष्टीत सध्या 'भूल भुलैय्या-३' तसेच 'सिंघम अगेन' या दोन चित्रपटांची सर्वाधिक चर्चा होताना दिसते आहे.

bollywood actress madhuri dixit reaction on bhool bhulaiyaa 3 and singham again movies clash | 'भूल भुलैय्या-३' व 'सिंघम अगेन' क्लॅशवर पहिल्यांदाच व्यक्त झाली माधुरी दीक्षित; म्हणाली-"चित्रपट चालले नाहीत तर..."

'भूल भुलैय्या-३' व 'सिंघम अगेन' क्लॅशवर पहिल्यांदाच व्यक्त झाली माधुरी दीक्षित; म्हणाली-"चित्रपट चालले नाहीत तर..."

Madhuri Dixit: हिंदी सिनेसृष्टीत सध्या 'भूल भुलैय्या-३' 'Bhool Bhulaiya- 3' तसेच 'सिंघम अगेन' (Singham Again) या दोन चित्रपटांची सर्वाधिक चर्चा होताना दिसते आहे. यंदा दिवाळीच्या शुभमूहुर्तावर हे दोन्ही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. रोहित शेट्टी यांच्या 'सिंघम अगेन'मध्ये बॉलिवूड कलाकारांची फौज पाहायला मिळते आहे. तर 'भूल भुलैय्या-३' सिनेमातकार्तिक आर्यनच्या जोडीला माधुरी दीक्षित आणि विद्या बालन या तगड्या नायिका आहेत. १ नोव्हेंबरच्या दिवशी 'भूल भुलय्या-३' व 'सिंघम अगेन' असे दोन चित्रपट एकाच दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आले. पहिल्याच दिवसापासून या चित्रपटांमध्ये कमाईच्या बाबतीत कॉंटे की टक्कर पाहायला मिळते. बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत अजय देवगणच्या 'सिंघम अगेन'पेक्षा कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैय्या ३' वरचढ ठरत आहे. यावर आता माधुरी दीक्षितने भाष्य केलं आहे.

नुकतीच माधुरी दीक्षितने मीडियासोबत खास बातचीत केली. त्यादरम्यान अभिनेत्री म्हणाली, "मी ईश्वराकडे प्रार्थना केली होती की दोन्ही चित्रपट चांगले चालावेत. कारण चित्रपट चालले नाहीतर इंडस्ट्रीची प्रगती होणार नाही. 'दिल' चित्रपटाच्यावेळी असंच काही घडलं होतं. 'दिल आणि 'घायल' हे दोन्ही चित्रपट तेव्हा एकाच दिवशी रिलीज करण्यात आले होते. त्यावेळी एक चित्रपट रोमॅन्टिक आहे त्यामुळे दुसराच चित्रपट चालेल असे अंदाज लावले गेले होते. परंतु दोन्ही सिनेमे सुपरहिट ठरले. त्यामुळे दर शुक्रवारी एक ब्लॉकबस्टर चित्रपट रिलीज केला पाहिजे, तरच इंडस्ट्री पुढे जाईल."

पुढे अभिनेत्री म्हणाली, "कोणीही पैसा कमावण्यासाठी चित्रपटाची निर्मिती करतो. याच आशेवर पैसा गुंतवला जातो. कलाकारांसाठी चित्रपट फ्लॉप झाला तरी त्यांच्या कामाचं कौतुकच केलं जातं. शिवाय वेगवेगळ्या लोकांसोबत ओळखी वाढतात. 'भूल भुलैय्या-३' च्या सेटवरही आम्ही असेच वागायचो. एकमेकांसोबत मज्जामस्ती करून सेटवर उत्साहाचं वातावरण निर्माण करायचो. हा जो बॉण्ड तुम्ही बनवता तो कामय राहतो. भले ३० वर्षानंतरही तुमची भेट झाली तरी तुमच्यातील नातं हे तसंच राहतं."

Web Title: bollywood actress madhuri dixit reaction on bhool bhulaiyaa 3 and singham again movies clash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.