Join us

बॉलिवूडची अभिनेत्री साऊथ स्टारसोबत करणार रोमान्स, अक्षयसोबत डेब्यू करुनही ठरली 'फ्लॉप'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 17:16 IST

'मिस वर्ल्ड' ते अक्षय कुमारसोबत डेब्यू तरी चालली नाही अभिनेत्रीची जादू!

'मिस वर्ल्ड' हा मानाचा खिताब पटकावणारी अशी अभिनेत्री जी अद्याप बॉलिवूडमध्ये जम बसवू शकलेली नाही. आता ती साऊथमध्ये नशीब आजमवताना दिसणार आहे. अक्षय कुमार, विकी कौशल यांसारख्या आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम करुनही तिला अजूनही बॉलिवूडमध्ये ओळख मिळवता आलेली नाही. तिचे दोन्ही हिंदी चित्रपट जबरसदस्त फ्लॉप ठरले. आता तिच्या साऊथ प्रदर्शनाकडे सर्वांचं लक्ष आहे. कोण आहे ती अभिनेत्री?

2017 साली 'मिस वर्ल्ड' हा मानाचा खिताब पटकावणारी ही आहे मानुषी छिल्लर (Manushi Chhillar). मेडिकल क्षेत्र सोडून मानुषी अभिनय क्षेत्रात आली. 2022 साली तिने 'खिलाडी' अक्षय कुमारच्या 'सम्राट पृथ्वीराज' मधून हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. अक्षय कुमार असातानाही सिनेमा दणकून आपटला. यानंतर ती विकी कौशलसोबत गेल्या वर्षीच आलेल्या 'द ग्रेट इंडियन फॅमिली' मध्ये दिसली. याही सिनेमात तिला फारशी स्वत:ची छाप पाडता आली नाही. आता ती आगामी दाक्षिणात्य प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. साऊथ स्टार वरुण तेजसह ती आगामी 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन' या तेलुगू सिनेमात झळकणार आहे. मानुषीने सोशल मीडियावर पोस्टर शेअर केले आहे. सिनेमाचं दुसरं गाणं नुकतंच रिलीज झालं असून यासंबंधी मानुषीने पोस्ट केली आहे.

ऑपरेशन व्हॅलेंटाईन हा सिनेमा 16 फेब्रुवारी रोजीच रिलीज होणार होता. मात्र आता हा सिनेमा 1 मार्च रोजी प्रदर्शित होणार असल्याची घोषणा मेकर्सने केली आहे. मानुषी या सिनेमासाठी खूपच उत्साहित आहे. वायुदलाचे अधिकारी आणि देशाच्या संरक्षणासाठी त्यांच्यासमोरील आव्हाने याभोवती सिनेमाची कथा अवलंबून आहे. 40 कोटींच्या बजेटमध्ये सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय मानुषी अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या आगामी 'बडे मियां छोटे मियां' सिनेमातही दिसणार आहे. 

टॅग्स :मानुषी छिल्लरअक्षय कुमारTollywoodसिनेमा