Join us

'या' एका व्यक्तीच्या प्रेमाखातर रेखा कायम नेसतात कांजीवरम साड्या; स्वत: केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 11:06 AM

Rekha: रेखा यांच्या कांजीवरम साडी नेसण्यामागे अमिताभ बच्चन हे कारण नसून एक अन्य व्यक्ती आहे.

अभिनय कौशल्य आणि सौंदर्य यांच्या जोरावर बॉलिवूडवर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे रेखा (rekha). या अभिनेत्रीची प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल आयुष्याची कायम चर्चा रंगली. किंबहुना आजही चर्चा रंगताना दिसते. यात खासकरुन तिचे प्रेमप्रकरणे विशेष गाजले. मात्र, यावेळी तिच्या कोणत्याही प्रेमप्रकरणाची चर्चा रंगली नसून तिच्या कांजीवरम साड्यांची चर्चा होताना दिसते. रेखा कायम कांजीवरम साडीमध्येच दिसून येते. त्यामुळे ती कायम कांजीवरम साड्याच का नेसते हा प्रश्न अनेकांना पडतो. या प्रश्नाचं उत्तर स्वत: अभिनेत्रीने दिलं आहे.

बॉलिवूडमधील कुठलाही पुरस्कार सोहळा असला किंवा पार्टी असली की रेखा या कायम भारतीय पारंपरिक वेशात म्हणजेच साडी नेसून जातात. यात खासकरुन त्या कांजीवरम साडीलाच पसंती देतात. परंतु,  इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या असतानाही त्या कांजीवरम साडीलाच का पसंती देतात हा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र, या प्रश्नाचं उत्तर रेखा यांनी एका मुलाखतीमध्ये दिलं.

एका नावामुळे पडली मौसमी-रेखाच्या मैत्रीत फूट; 'त्या' सिनेमानंतर पुन्हा कधीच आल्या नाहीत एकत्र

''मी कायम कांजीवरम साड्या नेसते कारण, त्या साड्या नेसल्यावर मला माझी आई जवळ असल्यासारखं वाटतं. या साड्या माझ्या आईची आठवण करुन देतात मला. मी माझ्या आईमुळेच इतकी स्टायलिश आहे'', असं रेखा म्हणाल्या.

रेखा यांच्या भांगेत कोणाचं कुंकू? अखेर बऱ्याच वर्षांनी खुद्द अभिनेत्रीने केला खुलासा

दरम्यान, रेखा यांचा आज (१० ऑक्टोबर) त्यांचा ६९ वा वाढढिवस साजरा करत आहेत. त्यामुळे सध्या त्यांच्याविषयी अनेक गोष्टी चर्चिल्या जात आहेत. रेखा यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक गाजलेले सिनेमा केले. यात सिलसिला, उमराव जान, दो आँखे, घर, सुहाग, संसार या सिनेमांचं आवर्जुन नाव घेतलं जातं. 

टॅग्स :रेखाअमिताभ बच्चनबॉलिवूडसेलिब्रिटी