Join us

मराठमोळ्या बिझनेसमनशी समीरा रेड्डीने थाटलाय संसार; तुम्हाला माहितीये का कोण आहे तिचा नवरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 18:11 IST

Sameera reddy: लग्नानंतर समीराने कलाविश्वापासून फारकत घेतली.

कलाविश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी इंडस्ट्री बाहेरील व्यक्तीची जोडीदार म्हणून निवड केली आहेत. यात अभिनेत्री मिनाक्षी क्षेषाद्री, जुही चावला, प्रिती झिंटा अशा कितीतरी अभिनेत्रींचा समावेश आहे. यामध्येच सध्या लोकप्रिय अभिनेत्री समीरा रेड्डी हिच्या नावाची चर्चा होत आहे. समीराने एका मराठमोळ्या बिझनेसमॅनसोबत लग्न केलं आहे. इतकंच नाही तर लग्नानंतर तिने कलाविश्वापासून फारकतही घेतली आहे. त्यामुळेच समीराचा नवरा कोण आहे असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून समीराचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे.सध्या ती तिच्या मुलांसोबत आणि कुटुंबासोबत तिचा वेळ घालवतांना दिसते. मात्र, सोशल मीडियावर ती कमालीची सक्रीय आहे. ती आणि तिच्या सासूबाई दोघी मिळून एक कुकिंग पेजही चालवतात. त्यामुळे ती सतत या ना त्या कारणामुळे चर्चेत येत असते.

समीराने 1997 मध्ये गझल गायक पंकज उधास यांच्या म्युझिक व्हिडिओद्वारे आपल्या कारकीर्दीची सुरूवात. त्यानंतर २००२ साली 'मैंने दिल तुझको दिया' या सिनेमाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. समीरा बॉलिवूडच्या अनेक सिनेमांमध्ये दिसली. 'डरना मना है', 'मुसाफिर,'नो एंट्री','प्लान',' टॅक्सी नंबर 9 2 11 'आणि' दे दना दन ' या सिनेमांमध्ये ती झळकली. २०१२ मध्ये रिलीज झालेल्या प्रकाश झाच्या 'चक्रव्यूह'मध्ये ती शेवटीची दिसली होती.

कोण आहे समीराचा नवरा?

2014 मध्ये समीराने बिझनेसमन अक्षय वर्देसोबत लग्न केलं. लग्न झाल्यावर तिने बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला. समीरा आणि अक्षय यांची पहिली भेट एका अ‍ॅड शूटच्या दरम्यान झाली होती. त्यानंतर दोन वर्ष एकमेकांना डेट केल्यावर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. मराठमोळ्या पद्धतीने समीरा आणि अक्षयने लग्नगाठ बांधली. 

टॅग्स :समीरा रेड्डीबॉलिवूडटेलिव्हिजनसेलिब्रिटी