Sanya Malhotra:बॉलिवूडची 'दंगल गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सान्या मल्होत्रा (Sanya Malhotra) सध्या तिचा आगामी चित्रपट 'मिसेस' मुळे चर्चेत आहे. वेगवेगळ्या चित्रपटांमधून काम करुन सान्याने तिचं अभिनय कौशल्य सिद्ध केलं आहे. परंतु खऱ्या अर्थाने 'दंगल' चित्रपटामुळे सान्याच्या करिअरला एक वेगळे वळण मिळून ती घराघरात पोहोचली. या चित्रपटानंतरही तिने अनेक चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारल्या. तिने तिच्या टॅलेंटच्या जोरावर प्रेक्षकांची वाहवा मिळवली. सध्या मिसेस चित्रपटाच्या प्रमोशनानिमित्त अभिनेत्रीने खास मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये सान्याने दंगल चित्रपट केल्यानंतर तिच्या वैयक्तिक आयुष्यावर काय परिणाम झाला यावर खुलेपणाने भाष्य केलं आहे.
नुकतीच सान्या मल्होत्राने शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. त्यादरम्यान, अभिनेत्रीने अनेक खुलासे केले. त्यावेळी अभिनेत्रीला 'दंगल' चित्रपटाचा कोणता निगेटिव्ह इम्पॅक्ट झाला या प्रश्नाचं उत्तर देत अभिनेत्री म्हणाली, "निगेटिव्ह इम्पॅक्ट असा झाला की, माझे केस वाढत नव्हते. त्यासाठी मी बरेच उपाय केले. उलटी झोपायचे. शिवाय मी चंपी केली. त्यामुळे माझी हालत खूप खराब झाली होती." असा खुलासा सान्याने केला.
'दंगल' चित्रपटाने सान्याला एका रात्रीत स्टार बनवलं. या चित्रपटात ती बबिता कुमारीच्या भूमिकेत होती. आतापर्यंत सान्याने आमिर आणि शाहरुख खानसह अनेक मोठ्या स्टार्ससोबत स्क्रीन शेअर केली आहे. आज तिची बॉलिवूडच्या आघाडीच्या नायिकांमध्ये केली जाते.