बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही एक शिवभक्त असून अनेकदा दिसले आहे. 'केदारनाथ' चित्रपटातून पदार्पण करणारी अन् प्रसिद्धीच्या झोतात आलेली सारा तिचा कोणताही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी धार्मिक यात्रा आवर्जुन करते. पुन्हा एकदा तिनं ही परंपरा कायम ठेवत उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराला भेट दिली होती. सारा अली खान आणि विकी कौशल स्टार 'जरा हटके जरा बचके' प्रदर्शित झाल्यापासून चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाने सध्या चांगले कलेक्शन केले आहे. चित्रपटाला प्रचंड प्रेम मिळाल्यानंतर सारा अली खानने धार्मिक स्थळांना भेट दिली.
सारा महाकालेश्वर मंदिरात नतमस्तकसारा अली खानने चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात पूजा केली होती. त्यानंतर तिला खूप ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागले. तेव्हा तिने टीकाकारांना प्रत्युत्तर देखील दिले होते. आता चित्रपटाच्या भरघोस यशानंतर सारा अली खान पुन्हा एकदा महाकालेश्वर मंदिरात नतमस्तक झाली.
सारा अली खानने नंदी हॉलमध्ये जाऊन महाकालेश्वराचे दर्शन घेतले. मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन तिनं दर्शन घेतले तसंच आरती देखील केली. यानंतर त्यांनी महाकालेश्वर संकुलात असलेल्या कोटीतीर्थ कुंडालाही भेट दिली. उज्जैनमध्ये दर्शन घेतल्यानंतर सारा इंदूरला रवाना झाली. इथे तिने खजराना गणेश मंदिराला भेट दिली.