Urvashi Rautela vs Naseem Shah : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ही सतत चर्चेत राहतेय... एका मुलाखती RP असा उल्लेख करून तिने भारताचा यष्टिरक्षक रिषभ पंतला डिवचले. त्यावर रिषभनेही सडेतोड उत्तर देत फिरकी घेतली. त्यात आशिया चषक स्पर्धेच्या मॅच पाहण्यासाठी उर्वशी थेट यूएईला पोहोचली. स्टेडियमवरली तिचे फोटो व्हायरल झाल्यानंतर पुन्हा सोशल मीडियावर रिषभ ट्रेंडिंगमध्ये आला. भारताचे आव्हान संपुष्टात आल्यानंतरही उर्वशी ट्रेंडिंगमध्ये आहे, कारण पाकिस्तानी गोलंदाज नसीम शाहसोबत व्हायरल झालेला तिचा व्हिडीओ...
भारत-पाकिस्तान यांच्यातल्या सुपर ४ मधील लढतीतही उर्वशी स्टेडियमवर होती. भारताच्या पराभवानंतर इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ व्हायरल झाला त्यात उर्वशी हसतेय आणि लगेचच दुसऱ्या फ्रेममध्ये नसीमही हसताना दिसतोय. बॅगग्राऊंड म्युझिकला रोमँटिक गाणंही वाजतंय... ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तानचा गोलंदाज नसीमला याबाबत विचारले असता मी तिला ओळखतही नाही, असे उत्तर त्याने दिले.
बेहेन, छोटू भैयानंतर Rishabh Pant ने अभिनेत्री उर्वशीला डिवचले होते...
उर्वशीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होती आणि त्यात एका मुलाखतीत तिने रिषभसोबतच्या त्या भेटीवर स्पष्ट मत मांडले होते. उर्वशीने सांगितले होते की,''मी वाराणसीहून शूटींग संपवून दुसऱ्या प्रोजेक्टसाठी दिल्लीत दाखल झाली. वेळापत्रक एवढं व्यग्र होतं की मला कोणाला भेटण्याचीही वेळ नव्हती. दिल्लीत शुटींग करून झाल्यानंतर मी एवढी थकली होती की १० तास झोपून राहिले. त्या दरम्यान ६०-७० मिस्ड् कॉल माझ्या मोबाईलवर येऊन गेले होते. उठल्यावर ते मी पाहिले. ती व्यक्ती ( तिने रिषभचं नाव नाही घेतलं) मला भेटण्यासाठी वाट पाहत होती आणि त्यानंतर मी त्याला भेटले. मीडियाने ही गोष्ट एवढी रंगवली की...''
त्यानंतर रिषभने पोस्ट लिहिली होती की, तुरळक प्रसिद्धीसाठी काही लोकांना मुलाखतीत खोटं बोलताना पाहून, गंमत वाटतेय. त्यांना हेडलाईनमध्ये राहायचे आहे. लोकं प्रसिद्धीसाठी एवढे तहानलेले आहेत, हे पाहून दुःख होतंय. #merapichachorhBehen #Jhutkibhilimithotihai.... यावर उर्वशीने प्रत्युत्तर दिले होते की, 'छोटू भैया को बैट बॉल खेलना चाहिए. मैं कोई मुन्नी नहीं हूं डार्लिंग बच्चे तेरे लिए बदनाम होने को. रक्षा बंधन मुबारक हो. #RPChotuBhaiyya #Cougarhunter #donttakeadvantageofasilentgirl.' पंतने आणखी एक इंस्टा स्टोरी पोस्ट लिहून म्हटले होते की ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर असतात त्याचा ताण घेऊ नका