Join us  

बॉलिवुडमधले मराठी कलाकार

By admin | Published: April 15, 2015 12:00 AM

हंगामा प्राण जाऐ पर शान ना जाऐ या चित्रपटांतही उल्लेखनीय भुमिका असलेल्या संजय नार्वेकरला वास्तव या सिनेमाने देढफुट्या भाई ...

हंगामा प्राण जाऐ पर शान ना जाऐ या चित्रपटांतही उल्लेखनीय भुमिका असलेल्या संजय नार्वेकरला वास्तव या सिनेमाने देढफुट्या भाई हे टोपण नाव दिले.

महेश मांजरेकर मराठी सह हिंदी चित्रपटात अभिनय व दिग्दर्शनसाठी गाजलेले नाव. प्राण जाऐ पर शान न जाऐ कांटे वॉन्टेड इत्यादी चित्रपटांमध्ये अभिनय केला. वास्तवमुळे महेश मांजरेकर यांना बॉलिवुडमध्ये वलय निर्माण झाले.

मराठी रंगभूमीवरून अभिनयाची सुरवात केलेल्या रीमा यांना आईकडून अभिनयाचा वारसा मिळाला. कयामत से कयामत तक हम आप के है कौन कल होना हो इत्यादीं सह अनेक सुपहिट बॉलिवुड चित्रपटांत त्यांनी अभिनय केला आहे

आशुतोष राणा यांची पत्नी असलेल्या रेणुका शहाणे यांनी मराठी चित्रपट सूनबाईचा भाऊ दुरदर्शनवरील सुरभी मालिकेतून आपल्या करिअरची सुरवात केली. हम आपके है कोन मधली त्यांची भुमिका गाजली.

सत्ते पे सत्ता शोले सारख्या गाजलेल्या चित्रपटांत मराठीतील सुपरस्टार सचिन पिळगावकर यांच्या भुमिका देशभरातील प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.

शूल चित्रपटातील खलनायक बच्चु यादव म्हणून गाजलेली भुमिका करणारे सयाजी शिंदे यांनी ही आपल्या करिअरची सुरवात मराठी रंगभुमिवरून करून हिंदी सह तेलगू व अन्य भाषांत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला

आभाळमाया या मराठी मालिकेपासून सुरवात केलेल्या आणि हिंदीतील इक्बाल दोर गोलमाल इत्यादी सिनेमांत श्रेयसने केलेल्या भुमिका सरसच आहेत.

अशोक सराफ - मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अशोक सराफ यांनी येस बॉस कोयला करण अर्जून इत्यादी चित्रपटांतून हिंदीचित्रपटांत उल्लेखनीय भुमिका साकारल्या.

लय भारी चित्रपटातील मराठी अभिनेत्री राधिका आपटे हीने तमिळ तेलगू मल्याळमसह हिंदीतील शोर इन द सिटी रक्तचित्र इत्यादी चित्रपटांत उल्लेखनीय काम केले आहे. बदलापूर बॉईज मधील तिची भुमिका प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय होता.

नो इंट्री पुढे धोका आहे चित्रपटात बोल्ड भुमिका साकारणारी सई ताम्हणकरने आता हंटर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.