सिद्धार्थ मल्होत्राचा स्टुडंट ऑफ द इयर हा सिनेमा खूपच गाजला. त्यानंतर त्यानं एक व्हिलन या चित्रपटात केलेली भूमिका अनेकांच्या पसंतीस उतरली. मात्र अद्यापही सिद्धार्थनं लग्न केलं नाही.
अर्जुन कपूरचा इश्कजादे आणि टू स्टेप या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई केली. त्यामुळे खरा प्रसिद्धीच्या झोतात आला. मात्र त्याचं अद्यापही लग्न झालेलं नाही.
रामलीला आणि बाजीराव मस्तानी या चित्रपटांमधून बॉलिवूडमध्ये छाप पाडणारा रणवीर सिंग अद्यापही बॅचलर आहे. रणवीर सिंगचं आधी अनुष्का शर्माशी नाव जोडलं गेलं होतं. मात्र आता त्याचं दीपिका पदूकोणशी अफेअर असल्याची चर्चा आहे. मात्र अद्यापही तो सिंगल आहे.
रणवीर कपूर आणि कतरिना कैफच्या अफेअरची मधल्या काळात खूप चर्चा होती. रणवीरनं कतरिनासाठी भाड्यानं प्लॅटही घेतल्याची चर्चा होती. मात्र त्याचं आणि कतरिनाचं ब्रेकअप झाल्याचंही बोललं जातं आहे.
अक्षय खन्नाचे बॉर्डर आणि हमराज सारखे चित्रपट खूपच गाजले. दोन्ही चित्रपटातल्या भूमिकांना त्यानं योग्य न्याय दिला. मात्र 41 वर्षं वयाचा अक्षय खन्ना अजूनही लग्नाच्या बेडीत अडकला नाही.
वरुण धवन हा प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेता आहे. त्यानं अनेक चित्रपटांत केलेल्या भूमिका अनेकांच्या पसंतीस पडल्या आहेत. बॉलिवूडमध्ये त्यानं स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र तो अद्यापही बॅचलर आहे.
बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या आयुष्यात अनेक मुली आल्या आणि गेल्याही. चित्रपटांतून वेगवेगळ्या भूमिका करणारा सलमान ख-या आयुष्यात मात्र अद्यापही अविवाहित आहेत. अनेक अभिनेत्रींसोबत त्याचं नाव जोडलं गेलं. मात्र अद्यापही त्यानं लग्न केलेलं नाही.