बॉलिवूड अभिनेत्री जरीन खानने सलमान खानसोबत ‘वीर’ चित्रपटातून डेब्यू केला होता. हुबेहुब कतरीना कैफ सारखी दिसते म्हणून तिची बरीच चर्चा झाली होती. जरीन बॉलिवूडची बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. पण काही वर्षांआधी ती आत्तासारखी मुळीच नव्हती. चित्रपटात येण्याआधी ती चांगलीच गोलमटोल होती. इतकी की, तिचे जुने फोटो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. तेव्हा पाहु या आज तिचे काही तुम्ही यापूर्वी कधीही न पाहिलेले फोटो.
कतरीना कैफसारखी दिसते म्हणून जरीनला ‘वीर’ चित्रपट मिळाला होता. ‘वीर’ या सिनेमाच्यावेळी सलमान आणि जरीन यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले होते. पण काहीच दिवसांत या केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले होते. ‘वीर’नंतर हाऊसफूल २, हेट स्टोरी ३ या सिनेमातही ती दिसली होती.
जरीन खानचा जन्म सन 1987 मध्ये मुंबईत येथे झाला होता. आश्चर्य वाटेल पण 12 वीत असताना तिचे वजन 100 किलो होते.बॉलिवूडसाठी जरीनने स्वत:ला पुरते बदलले. जिममध्ये तासन् तास घाम गाळून तिने ग्लॅमरस फिगर मिळवली. अर्थात मी लोकांसाठी नाही तर स्वत:साठी वजन कमी केल्याचे जरीन म्हणते. एका पोस्ट मध्ये लिहिले होते कि, मी लोकांच्या टोमण्यावर कधीच लक्ष दिले नाही. मी माझ्यासाठी माझे वजन कमी केले.
आपल्या सोशल अकाऊंटवर जरीनने तिचे काही जुने फोटो शेअर केलेले आहेत. हा फोटो ती जेव्हा कॉलेजमध्ये होती तेव्हाचा आहे. या फोटोमध्ये जरीन आपल्या वयापेक्षा जास्त मोठी दिसते आहे. या फोटोमध्ये जरीनने ट्रॅडिशनल ड्रेस परिधान केला आहे तर दुस-्या फोटोमध्ये ती सलवार सूट मध्ये पाहायला आहे.
फोटो शेयर करताना जरीनने लिहिले आहे की, जेव्हा मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले तेव्हा मी खूपच वजन कमी केले होते, परंतु पहिल्या चित्रपटात तिच्या भूमिकेनुसार वजन वाढवण्यास सांगण्यात आले होते. माझ्या वजनाबद्दल मला टीका सहन करावी लागली. आता जरीनने स्वत:ला खूपच फिट केले आहे. तिचे हे अलीकडील फोटो याचा पुरावा आहेत.