Join us

बॉलिवुड ब्रेकअप

By admin | Published: January 19, 2016 12:00 AM

रिअॅलिटी शो "बिग बॉस"च्या घरात अभिनेत्री तनिषा मुखर्जी आणि अरमान कोहलीची पहिल्यांदा ओळख झाली आणि दोघे एकमेकाच्या प्रेमात पडले. ...

रिअॅलिटी शो "बिग बॉस"च्या घरात अभिनेत्री तनिषा मुखर्जी आणि अरमान कोहलीची पहिल्यांदा ओळख झाली आणि दोघे एकमेकाच्या प्रेमात पडले. दोघे लग्न करणार असल्याची चर्चा होती पण काही महिन्यातच त्याच्या ब्रेकअप झाल्याची बातमी आली.

पुलकीत सम्राट सलमानचा मानलेली बहिण श्वेता रोहिराचा नवरा आहे. पुलकीत यामी गुप्ताच्या जवळ गेल्यामुळे सध्या सलमानाच्या बहिणीच्या संसारात वादळ उठल्याची चर्चा आहे.

जॉन अब्राहमने साथ सोडल्यानंतर एकाकी पडलेल्या बिपाशा बासूच्या आयुष्यात करणसिंह ग्रोव्हरच्या रुपाने प्रेमाचा नवा अध्याय सुरु झाला आहे. अलीकडेच दोघांनी थायलंडमध्ये बिपाशाचा ३७ वा वाढदिवस साजरा केला.

ह्रतिक रोशन आणि सूझान खानच्या घटस्फोटाच्या बातमीने अनेकांना धक्का बसला घटस्फोटाचे नेमके कारण कधीच बाहेर आले नाही मात्र ह्रतिकचे नाव स्पॅनिश अभिनेत्री बार्बरा मोरी तर सुझानचे नाव अर्जून रामपाल बरोबर जोडले गेले.

करीयरच्या सुरुवातीला दिपिका पदुकोणच्या आयुष्यात रणबीर कपूरला विशेष स्थान होते. दोघे परस्परांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. पण कतरिना रणबीरच्या जवळ आली आणि या जोडीला ग्रहण लागले.

बॉलिवुडमध्ये पदार्पण केल्यानंतर करिना कपूरचे शाहीद कपूरबरोबर सुत जुळले. सार्वजनिक कार्यक्रमात जाहीरपणे या जोडीने आपल्या प्रेमभावना व्यक्त केल्या. मात्र एका चित्रपटाच्या सेटवर करिनाशी अभिनेता सैफ अली खान बरोबर ओळख झाली आणि या ओळखीचे रुपांतर प्रेमात आणि नंतर विवाहात झाले.

सलमान खानशी ब्रेकअप झाल्यानंतर कतरिना कैफच्या आयुष्यात रणबीर कपूर आला. रणबीरने कतरिनाची आपल्या कुटुंबियांबरोबर भेट घडवून आणल्यानंतर दोघांच्या लग्नाचीही चर्चा सुरु झाली होती. मात्र आता या दोघांमध्ये ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे. "तमाशा" चित्रपटात दिपिका-रणबीरचे पुन्हा एकत्र येणे या ब्रेकअपला कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे.