मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि सलमान खाम यांनी फोर्ब्सच्या सर्वाधीक कमाई करणाऱ्या व्यक्तींच्या यादीत स्थान मिळवलं आहे. या यादीत अमेरिकन बॉक्सिंग चॅम्पियन फ्लोयड मेवेदरने अव्वल स्थान मिळवलं आहे. फोर्ब्सच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या व्यक्तींच्या यादीत अक्षय ७६व्या आणि सलमान खान हा ८२ व्या स्थानावर आहे.
फोर्ब्सने सांगितले की, जगातल्या या १०० लोकांची गेल्या १२ महिन्यातील कमाई ६.३ अरब डॉलर(४.३१ खरब रूपये) आहे. ही कमाई गेल्यावर्षीच्या तुलनेत २२ टक्क्यांनी अधिक आहे. या यादीत ११ स्टार्स आहेत ज्यांची कमाई जवळपास १०कोटी डॉलर(६.८३ अरब रूपये) इतकी आहे.
फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार, अक्षय कुमारने यावर्षी ४.०५ कोटी डॉलर(३.०७ अरब रूपये) ची कमाई केली आहे.
फोर्ब्सनुसार, बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने यावर्षी ३.७७ कोटी डॉलर(२.५७ अरब रूपये) इतकी कमाई केली आहे. तर या यादीत अव्वल स्थानावर असलेल्या मेवेदरने यावर्षी २८.५ कोटी डॉलर(१९.४९ अरब रूपये) इतकी कमाई केलीये.
या यादीत अभिनेता जॉर्ज क्लूनी दुसऱ्या स्थानावर, टीव्ही स्टार आणि महिला उद्योगपती कायली जेनर तिसऱ्या स्थानावर आहे. खेळाडूंमध्ये क्रिस्टीयाने रोनाल्डो(१०), पॉप स्टार कॅटी पेरी(19), टेनिस खेळाडू रॉजर फेडरर(२३), गायिका बियॉन्से नॉलेस(३५), लेखिका जे के रॉलिंग(४२) आणि गोल्फ खेळाडू टायगर वुड्स(६६) व्या स्थानावर आहे.