एखाद्या व्यक्तीचं टोपणनाव असणं ही काही फार नवीन गोष्ट नाही. प्रत्येक घरात एकातरी व्यक्तीला टोपणनावाने बोलावलं जातं. त्याचप्रमाणे कलाविश्वातही असे अनेक सेलिब्रिटी आहेत. ज्यांची काही खास टोपणनाव आहेत. या अभिनेत्री करीना कपूर खान, करिश्मा कपूर यांची टोपणनाव तर इंडस्ट्रीसह चाहत्यांना देखील माहित आहेत. परंतु, श्रद्धा कपूर, आलिया भट्ट वा अनुष्का शर्मा यांची टोपणनावं फार कमी जणांना माहित आहेत. त्यामुळे आज या सेलिब्रिटींचे निकनेम कोणते ते पाहुयात.
बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अनुष्का शर्मा. उत्तम अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर अनुष्काने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. त्यामुळे तिच्याविषयी प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. यामध्येच अनुष्काला प्रेमाने तिचे चाहते नुश्की म्हणतात हे साऱ्यांनाच ठावूक आहे. पण तिचे आई-वडील मात्र तिला प्रेमाने नुष्केश्वर असं म्हणतात. तसंच विराटदेखील तिला नुश्की असंच म्हणतो.
ऐश्वर्या राय बच्चन-
अभिनेत्री ऐश्वर्या राय अनेकदा अॅश, विश्वसुंदरी या उपनावानेच ओळखली जाते. मात्र, घरात तिला प्रेमाने गुल्लू म्हणतात. बच्चन कुटुंबातील प्रत्येक जण तिला गुल्लू याच नावाने हाक मारतात.
कपिल शर्मा-
खरं तर कपिल शर्मा कप्पू, कॉमेडि किंग या नावाने ओळखला जातो. मात्र, त्याला घरात टोनी म्हणतात.
आलिया भट्ट-
आलिया लहानपणी खूप हेल्दी असल्यामुळे तिला घरातील प्रत्येक जण आलू-कचालू म्हणतात. तर, चाहते तिला आलू असंच म्हणतात.
रणबीर कपूर -रणबीर कपूरला खरं तर कोणतंही टोपणनाव नाही. मात्र, त्याची आई अभिनेत्री नीतू कपूर त्याला रेमंड म्हणते.
श्रद्धा कपूर -श्रद्धाला एक नाही तर तीन टोपणनावं आहेत. यात चिमडी, राणी आणि श्रद्ध्स अशा नावाने तिला बोलावलं जातं.
प्रियंका चोप्रा-
प्रियांकाला पीसी म्हणतात हे सगळ्यांनाच माहित आहे. पण तिला कुटुंबातील सदस्य मिठू बोलतात. तसंच काही जण तिला मिमी सुद्धा म्हणतात.
हृतिक रोशन -हृतिक रोशन खरं तर हॅण्डसम हंक म्हणून ओळखला जातो. परंतु, त्याला घरात दुग्गू असं म्हणतात.
वरुण धवन -वरुण धवनला घरात सगळे प्रेमाने पप्पू म्हणतात.