Join us

संजय कपूरची मुलगी शनाया कपूर ठरते इंटरनेट सेंसेशन,बॉलिवूड डेब्यूपूर्वीच बनली लोकप्रिय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 15:03 IST

शनायाला नेहमीच सुहाना खान आणि अनन्या पांडेसोबत बघण्यात आले आहे. तिघीही खूप चांगल्या मैत्रिणी आहेत.

बॉलीवुडचा अभिनेता संजय कपूर याची लाडाची लेक म्हणजे शनाया कपूर. शनाया ही सोनमप्रमाणेच सौंदर्यांत कुठेही कमी नाही. सोनम आणि आनंद आहुजा यांच्या लग्नसोहळ्यात शनाया ग्लॅमरस अंदाजात अवतरली.  शनाया अचानक साऱ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली होती . अभिनेता संजय कपूर आणि महीप कपूर यांची शनाया ही लेक आहे. चुलत बहिण सोनमप्रमाणेच फॅशनिस्टा अशी शनाया कपूरची ओळख आहे. आपली फॅशन, स्टाईल याबाबत शनाया बरीच सजग असते.

कुठेही बाहेर जाताना आपली ड्रेसिंग स्टाईल, फॅशन याची शनाया विशेष खबरदारी घेते. बॉलीवुडचे इव्हेंट्स, पार्ट्या आणि पुरस्कार सोहळ्यांमध्ये शनाया पाहायला मिळते. स्टार किड असूनही शनायाल स्वतःला कॅमेऱ्यापासून दूर ठेवते. मात्र सोशल नेटवर्किंग साईटवर तिचे ग्लॅमरस फोटो सा-यांचे लक्ष वेधून घेत आहे. तिचा हा अंदाज, अदा आणि सौंदर्य पाहून वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत शनाया कपूरसुद्धा लवकरच बॉलीवुडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा सध्या रंगल्याचे पाहायला मिळत आहे. 

सिनेमात झळकण्यापूर्वीच शनाया लोकप्रिय होत आहे. शनाया अलीकडे १९ वर्षांची झाली. त्यामुळे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी ती आता सज्ज असल्याचे मानले जात आहे. एकंदर काय तर कपूर घराण्याची आणखी एक मुलगी बॉलिवूडसाठी सज्ज आहे.चुलत बहीण जान्हवी कपूर आणि खास मैत्रिण अनन्या पांडे यांच्याप्रमाणेच शनायाचाही डेब्यू ग्रॅण्ड असणार आहे, हे सांगणे नकोच.

संजय कपूर आणि महीप या दाम्पत्याला शनाया आणि जहान नावाची दोन मुले आहेत. शनायाला नेहमीच सुहाना खान आणि अनन्या पांडेसोबत बघण्यात आले आहे. तिघीही खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. शनाया सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. तिचे ग्लॅमरस फोटोंमुळे तिच्या फॉलोअर्सच्या संख्येतही चांगलीच वाढ होत आहे. 

टॅग्स :संजय कपूरशनाया कपूर