कलाविश्वात सध्याच्या काळात अनेक कलाकारांची रेलचेल पाहायला मिळते. यात दिग्गज कलाकारांपासून ते नवोदित कलाकारांपर्यंत अनेकांचा समावेश आहे. मात्र, याहीमध्ये काही कलाकार असे आहेत जे वर्षानुवर्ष इंडस्ट्रीमध्ये राज्य करत आहेत. त्यातलेच तीन अभिनेता म्हणजे शाहरुख (Shahrukh Khan) , सलमान (Salman Khan) आणि आमिर (Aamir Khan). उत्तम अभिनयाच्या जोरावर या कलाकारांनी कलाविश्वात स्वत:चं भक्कम स्थान निर्माण केलं आहे. ९०च्या दशकापासून हे तीनही खान प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. त्यामुळे त्याच्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायम प्रयत्न करत असतात. म्हणूनच, आज तीनही अभिनेत्यांपैकी सर्वाधिक श्रीमंत कोण ते जाणून घेऊयात.
आमिर खान (Aamir Khan) -
मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणार आमिर. वर्षातून एखाद-दुसरा सिनेमा करतो. मात्र, त्याने केलेला प्रत्येक चित्रपट सुपरहिट ठरतो. आमिर त्याच्या प्रत्येक चित्रपटाची निवड अत्यंत बारकाईने करत असतो. विशेष म्हणजे आमिर एका चित्रपटासाठी भलंमोठं मानधन स्वीकारतो. तसंच जाहिरातींच्या माध्यमातूनही तो कमाई करत असतो. सूत्रांच्या माहितीनुसार, आमिरकडे जवळपास १२०० कोटी रुपयांपेक्षाही जास्त संपत्ती आहे.
सलमान खान (Salman Khan) -
बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान कलाविश्वातील प्रचंड चर्चेत राहणारा अभिनेता आहे. सलमान प्रोफेशन लाइफसोबतच पर्सनल लाइफमुळेही चर्चेत राहतो. अभिनयासोबतच सलमान एक व्यावसायिकही आहे. त्याचा स्वत:चा एक ब्रँडदेखील त्यामुळे सलमान विविध माध्यमातून पैसे कमवत असतो. सलमानची एकूण संपत्ती २३०० कोटींपेक्षाही जास्त आहे.
शाहरूख खान (Shahrukh Khan) -
बॉलिवूडचा किंग खान कलाविश्वाप्रमाणेच संपत्तीच्या बाबतीतही किंग आहे. सलमान, आमिरला मागे टाकत शाहरुख सर्वाधिक श्रीमंत अभिनेता ठरला आहे. शाहरुखची एकूण संपत्ती ४ हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे. शाहरुख अभिनयासह अन्य उद्योगव्यवसायही करतो. तसंच त्याची पत्नी गौरी खानदेखील प्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर आहे.