Join us

मन्नत नव्हे 'हे' आहे शाहरुखच्या बंगल्याचं खरं नाव; किंमत ऐकून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 12:55 PM

Shahrukh khan bungalow mannat: आर्यन घरी परतल्यानंतर संपूर्ण मन्नतवर दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. त्यामुळे सध्या शाहरुख आणि त्याच्या कुटुंबीयांसोबतच 'मन्नत' बंगलादेखील चर्चेत आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan)  लेक आर्यन खान (aryan khan) याला नुकतीच ड्रग्ज पार्टी (drugs party)  प्रकरणी जामीन मिळाला आहे. शनिवारी (३० ऑक्टोबर) आर्यनला आर्थर रोड तुरुंगातून सोडण्यात आलं. त्यानंतर आर्यन शाहरुख आणि गौरीसोबत त्याच्या घरी 'मन्नत'मध्ये (mannat) पोहोचला. त्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून चिंतेत असलेल्या खान कुटुंबाच्या घरी आता आनंदाचं वातावरण आहे. आर्यन घरी परतल्यानंतर संपूर्ण मन्नतवर दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. त्यामुळे सध्या शाहरुख आणि त्याच्या कुटुंबीयांसोबतच 'मन्नत' बंगलादेखील चर्चेत आहे. परंतु, या मन्नतचं खरं नाव किंवा त्याची किंमत किती हे फार मोजक्या जणांना ठावूक आहे. म्हणूनच, मन्नतचं खरं नाव काय ते पाहुयात.

मुंबईतील अनेक दिग्गज कलाकारांच्या आलिशान बंगल्यांमध्ये मन्नतचा समावेश केला जातो. या बंगल्याला मुंबईतील आयकॉनिक प्लेस म्हणून सुद्धा ओळखलं जातं. स्ट्रगल काळात किंग खान कित्येक वेळा या बंगल्याबाहेर उभा राहून स्वत:चे फोटो काढायचा. १९९७ मध्ये यस बॉस या चित्रपटावेळी शाहरुखने पहिल्यांदाच मन्नत आतून पाहिला होता. त्याचवेळी आयुष्यात हा बंगला विकत घेणार असा निश्चय त्याने केला. आणि ते करुन सुद्धा दाखवलं. 

गुजराती व्यक्तीचा होता हा बंगला

शाहरुखने मन्नतची खरेदी करण्यापूर्वी नरिमन दुबास या गुजराती व्यवसायिकाचं हे घर होतं. मात्र, नरिमन यांनी हा बंगला शाहरुखला विकला.  त्यावेळी शाहरुखने १३ कोटींमध्ये या घराची खरेदी केली होती. आज या बंगल्याची किंमत जवळपास २०० कोटी रुपयांच्या आसपास आहे.

मन्नत नव्हे हे होतं पहिलं नाव

आज मन्नत या नावाने ओळखलं जाणारं शाहरुखचं घर पूर्वी विला विएना (Villa Vienna) या नावाने ओळखलं जायचं. हे या घराचं पहिलं नाव होतं. त्यानंतर शाहरुखने या बंगल्याची खरेदी केल्यावर त्याचं नाव मन्नत असं ठेवलं.

दरम्यान, शाहरुख आणि त्याच्या कुटुंबियांना पाहण्यासाठी दररोज मन्नतबाहेर तुफान गर्दी होत असते. यावेळी शाहरुख मन्नतच्या टॉप फ्लोअरवर जाऊन चाहत्यांना हात दाखवतो. विशेष म्हणजे केवळ शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी चाहते सकाळपासून येथे त्याची वाट पाहत असतात.

टॅग्स :शाहरुख खानआर्यन खानबॉलिवूडसिनेमा