मुंबई : ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ या चित्रपटात वादग्रस्त दृश्यांवरून दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर माहिम पोलिसांनी ‘पॉक्सो’ व ‘आयटी’ कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणी महेश मांजरेकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायालयाने त्यांना अटकेपासून तत्काळ दिलासा देण्यास नकार दिला.
दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशावरून मांजरेकर यांच्यावर माहिम पोलिसांनी गुन्हा नोंदविला. मांजरेकर यांच्यावतीने ज्येष्ठ वकील शिरीष गुप्ते यांनी न्या. एस.एस. शिंदे व न्या. एन.आर. बोरकर यांच्या खंडपीठापुढे युक्तिवाद केला. ट्रेलरमध्ये दाखवलेली दृश्ये चित्रपटाचा भाग नाहीत व युट्यूबवरून ट्रेलरही हटवली आहेत,’ असे गुप्ते यांनी सांगितले.
युक्तिवादादरम्यान गुप्ते यांनी सर्वोच्च न्यायालयाने ‘बँडिट क्वीन’ चित्रपटासंदर्भात दिलेल्या निवाड्याचा हवाला दिला. तसेच दृश्ये ‘अश्लील’ असल्याचे म्हटले जात आहेत, ती न्यायालयाने पाहावी, असे गुप्ते यांनी म्हटलं. यावर न्यायालयाने म्हटले की, आम्ही चित्रपट नाही, तर एफआयआर पाहण्यासाठी आहोत.
नियमित खंडपीठापुढे जाण्याचे निर्देशजर आरोपींना अटक केली तर ते जामिनासाठी अर्ज करू शकतात, पण आम्ही संरक्षण देऊ शकत नाही. यासाठी नियमित खंडपीठापुढे जा, असे निर्देश न्यायालयाने मांजरेकर यांना दिले.