'कल याद आएंगे ये पल..'; मराठी कलाकारांनी KK यांना वाहिली भावपूर्ण आदरांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 10:14 AM2022-06-01T10:14:56+5:302022-06-01T12:20:41+5:30
Krishnakumar Kunnath Died: आजवरच्या कारकिर्दीत २०० पेक्षा जास्त गाणी गाणाऱ्या केके यांच्या निधनामुळे सेलिब्रिटींसह साऱ्यांनाच धक्का बसला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.
Krishnakumar Kunnath Died : 'यारों दोस्ती बडी ही हसीन है', 'सजदें किये हैं लाखो' अशा कितीतरी गाजलेल्या गाण्यातून प्रत्येकाला तारुण्यात नेणाऱ्या प्रसिद्ध गायक केके (KK) यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. एका लाइव्ह कॉर्न्स्ट दरम्यान हृदयविकाराचा झटका आल्यामुळे वयाच्या अवघ्या ५३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आजवरच्या कारकिर्दीत २५०० पेक्षा जास्त गाणी गाणाऱ्या केके यांच्या निधनामुळे सेलिब्रिटींसह साऱ्यांनाच धक्का बसला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. यात मराठी कलाविश्वातील काही कलाकारांनीही केके यांच्यासाठी पोस्ट शेअर केली आहे.
हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम, मराठी आणि बंगालीसह इतर भाषांमध्ये गाणी गाणाऱ्या केके अर्थात कृष्णकुमार कुननाथ (Krishnakumar Kunnath) यांच्या निधनामुळे कलाविश्वावर एक प्रकारची शोककळा पसरली आहे. त्यांचं असं अचानक सोडून जाणं कोणालाही सहन झालेलं नाही. त्यामुळेच मराठी कलाविश्वातील अभिनेत्री गायत्री दातार, निखिल राऊत, जुईली जोगळेकर आणि पुष्कर जोग यांनी इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट शेअर करत केके यांना आदरांजली वाहिली आहे.
कोण होते केके?
हिंदी सिनेमात केकेचं पहिलं गाणं 'माचिस' चित्रपटातील ‘छोड़ आए हम वो गलियां’ होतं. हे गाणं त्याच्यासोबतच हरिहरन, सुरेश वाडकर आणि विनोद सहगल यांनीही गायलं होतं. विशाल भारद्वाजने हे गाणं लिहिलं होतं. जे फारच गाजलं. पण त्याला मोठा ब्रेक सलमान खानचा सिनेमा ‘हम दिल दे चुके सनम’ मधून मिळाला. 'तडत तडप के हे' गाणं त्याने गायलं आणि तो फेमस झाला. त्यानंतर त्यांच्या यशाचा आलेख उंचावत गेला आणि त्यांनी आजवर २०० पेक्षा जास्त गाणी गायली.