Join us

OMG! रकुल प्रीत सिंग पडली जॅकी भगनानीच्या प्रेमात.., खुल्लमखुल्ला दिली प्रेमाची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 4:34 PM

Rakul Preet Singh: होय, आज रकुल तिचा 31 वा वाढदिवस साजरा करतेय आणि वाढदिवसाच्या दिवशीचं अभिनेत्रीने आपल्या प्रेमाची जाहिर कबुली दिली आहे. रकुलचं सरप्राईज चाहत्यांसाठीही सुखद धक्का देणारं ठरलं आहे.

ठळक मुद्देजॅकी हा दिग्गज निर्माते वाशू भगनानीचा मुलगा आहे. 2009 मध्ये प्रदर्शित ‘कल किसने देखा’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता.

साऊथ इंडस्ट्रीसोबतच बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री रकुल प्रीत सिंग ( Rakul Preet Singh) प्रेमात पडलीये. होय, आज रकुल तिचा 31 वा वाढदिवस साजरा करतेय आणि वाढदिवसाच्या दिवशीचं अभिनेत्रीने आपल्या प्रेमाची जाहिर कबुली दिली आहे. रकुलचं सरप्राईज चाहत्यांसाठीही सुखद धक्का देणारं ठरलं आहे.रकुल कुणाच्या पे्रमात पडली तर बॉलिवूडचा दिग्गज निर्माता व अभिनेता जॅकी भगनानीच्या (Jackky Bhagnani). होय,  जॅकीसोबतचा एक फोटो शेअर करत रकुलने  प्रेम जगजाहीर केलंय.

‘थँक यू माय लव्ह, तू माझ्यासाठी या वर्षीची सर्वात मोठी भेट आहेस. माझ्या आयुष्यात येऊन रंग भरल्याबद्दल तुझे खूप आभार. मला  क्षणा-क्षणाला हसवत राहिल्याबद्दल धन्यवाद. माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद. आणखी खूप आठवणी निर्माण करायच्या आहेत...,’अशा आशयाची पोस्ट तिने शेअर केली आहे.रकुलने प्रेमाची कबुली दिल्यानंतर जॅकी का मागे राहणार? त्यानेही रकुलनेच शेअर केलेला फोटो पोस्ट करत, आपल्या लेडी लव्हला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

‘ तुझ्याशिवाय  दिवस दिवस वाटत  वाटत नाही... तुझ्याशिवाय स्वादिष्ट भोजनही बेचव वाटतं...माझं जग असलेल्या जगातील सर्वात सुंदर मुलीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...,’ अशा शब्दात त्याने रकुलला बर्थ डे विश केलं आहे.रकुल व जॅकीच्या पोस्टनंतर काजल अग्रवाल, आयुष्यमान खुराणा, सोफी चौधरी अशा बॉलिवूडमधीलअनेक सेलिब्रिटींनी या कपलला शुभेच्छा दिल्या आहेत.   2009 साली ‘गिल्ली’ या कन्नड चित्रपटातून रकुलने आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात केली होती. यानंतर 2011 साली शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने पुन्हा कमबॅक केले. अगदी फार कमी वेळात रकुल साऊथची बडी स्टार म्हणून ओळखली जाऊ लागली. पाठोपाठ बॉलिवूडमध्येही तिचा डेब्यू झाला. अजय देवगणच्या ‘दे दे प्यार दे’ या चित्रपटात रकुल भाव खाऊन गेली.जॅकी हा दिग्गज निर्माते वाशू भगनानीचा मुलगा आहे. 2009 मध्ये प्रदर्शित ‘कल किसने देखा’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. पण त्याचा हा पहिलाच चित्रपट दणकून आपटला.  2011 मध्ये तो F.A.L.T.U. या चित्रपटात झळकला. यानंतर  अजब गजब लव्ह, रंगरेज, मित्रों अशा अनेक चित्रपटात तो दिसला.

टॅग्स :रकुल प्रीत सिंगजॅकी भगनानी