Salim Khan: प्रसिद्ध बॉलिवूड लेखक सलीम खान (Salim Khan) हे इंडस्ट्रीतील नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांच्या पटकथेचं लेखन केलं आहे. परंतु यशाच्या शिखरावर सलीम खान यांनी एक निर्णय घेतला आणि त्यांच्याकडे वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहण्यात आलं. सलीम यांनी सलमा खान यांच्याबरोबर १९६० मध्ये लग्नगाठ बांधली होती त्यानंतर त्यांनी १९८० मध्ये हेलन यांच्यासोबत लग्न केलं. दरम्यान, पहिलं लग्न आणि चार मुले पदरी असताना त्यांच्या या निर्णयाचा कुटुंबावर काय परिणाम झाला. याबद्दल सलीम खान यांनी एका मुलाखतीमध्ये खुलासा केला.
'डीएनए' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सलीम खान यांनी त्यांच्या दुसऱ्या लग्नावर भाष्य केलं. त्यादरम्यान त्यांनी म्हणाले, सलमा खान आणि हेलन यांना सुरुवातीला एकमेकींसोबत जुळवून घेणं कठीण होतं नंतर सगळं काही सुरळीत झालं. त्यादरम्यान, मुलाखतीमध्ये सलीम खान म्हणाले, "मी खूप भाग्यवान आहे कारण माझ्या दोन बायका आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या दोघीही घरात आनंदाने राहतात. त्यामुळे यापूर्वी काय झालं होतं, या गोष्टींनी काहीच फरक पडत नाही. "
पुढे सलीन खान यांनी सांगितलं, "जेव्हा मी सलमाला माझ्या आणि हेलनच्या नात्याबद्दल सांगितलं तेव्हा ती माझा हात देखील घ्यायला तयार नव्हती. कारण त्यावेळी परिस्थिती काही वेगळीच होती. साहाजिकच आहे कोणालाही अशा गोष्टीचा त्रास तर झालाच असता. पण, नंतर सगळं काही ठीक झालं. त्याचबरोबचर मी माझ्या मुलांना सुद्दा दुसऱ्या लग्नाबद्दल सांगितलं होतं. शिवाय माझ्या तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाहीत. तुम्ही तुमच्या आईवर जितकं प्रेम करता तितकंच प्रेम तिच्यावर करा, असं देखील मी सांगणार देखील नाही. परंतु मला असं वाटतं की तुम्ही तिचा आदर जरुर करावा." असा खुलासा त्यांनी केला.