Join us

"आजकालची तरुण मुलं थेट नाव घेऊन..." अनुराधा पौडवाल यांनी व्यक्त केली नाराजी; म्हणाल्या- "हे फार विचित्र..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 12:13 IST

आपल्या सुमधुर आवाजाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या गायिका म्हणजे अनुराधा पौडवाल.

Anuradha Paudwal: आपल्या सुमधुर आवाजाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या गायिका म्हणजे अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal). अनुराधा पौडवाल यांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या गायिकीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी असंख्य मराठी, हिंदी गाण्यांचं पार्श्वगायन केलं आहे. १९७३ साली प्रदर्शित झालेल्या ‘अभिमान’ या हिंदी चित्रपटातून माध्यमातून त्यांनी गायनाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. अनुराधा पौडवाल यांनी आतापर्यंत मराठी आणि हिंदीबरोबरच तमिळ, ओडिया, नेपाळी, बंगाली आणि कानडी चित्रपटांमध्येही गाणी गायली आहेत. दरम्यान, नुकतीच अनुराधा पौडवाल यांनी दिलेल्या एका मुलाखतीत सिनेसृष्टीतील सध्याच्या वस्तुस्थितीवर भाष्य केलं आहे.

नुकतीच अनुराधा पौडवाल यांनी 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी इंडस्ट्रीतील कलाकारांच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली आहे. या मुलाखतीमध्ये त्या म्हणाल्या, "आज कलाकारांमध्ये एज गॅप हा प्रकार राहिलेलाच नाही. ते आपल्यापेक्षा चौपट वय जरी असलं तरी समोरचा व्यक्ती आपल्याच वयाचा आहे अशा पद्धतीने बोलतात. हे मला थोडं विचित्र वाटतं."

पुढे अनुराधा पौडवाल म्हणाल्या, "मी नेहमीच बघते कितीतरी लहान मुलं किंवा तरुण मुलं लताजी किंवा आशाजी नाही तर थेट नाव घेऊन बोलतात. त्यांच्याकडून जी हा प्रकार फार कमीच ऐकू येतो. हे जरा चमत्कारिक वाटतं."अशी म्हणत त्यांनी मुलाखतीत नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :अनुराधा पौडवालबॉलिवूडसेलिब्रिटी