Ariji Singh On Kolkata Case : सुप्रसिद्ध बॉलिवूड प्लेबॅक सिंगर अशी अरिजीत सिंहची ओळख आहे. आपल्या सुरेल गायनाने त्याने कायमच चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं. सध्या देशातील सर्वाधिक लोकप्रिय गायकांच्या यादीत अरिजीत सिंहचं नाव अव्वल स्थानावर येत. नुकतंच अरिजीतचं एक गाणं यूट्यूबवर रिलीज झालं आहे. कोलकाता येथील निवासी डॉक्टर अत्याचार प्रकरणी त्याने या गाण्याच्या माध्यमातून आवाज उठवला आहे.
९ ऑगस्टच्या दिवशी कोलकाता येथील आरजी कार हॉस्पिटलमध्ये एका निवासी डॉक्टरसोबत अमानवी कृत्य घडले. या घटनेटचे पडसाह संपूर्ण देशभर उमटले. त्यानंंतर सामाजिक, राजकीय तसेच मनोरंजन विश्वातीलल अनेक कलावंत या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करू लागले. दरम्यान,या घटनेच्या निषेधार्थ गायकाने त्याने गायलेल्या गाण्याच्या माध्यमातून न्यायाची मागणी केली आहे. या पीडितेला न्याय मिळावा यासाठी अरिजीत सिंह पुढे सरसावला आहे.
गाण्याच्या माध्यमातून भावनिक साद -
अरिजीत सिंहने 'आर कोबे' या बंगाली गाण्याच्या साहाय्याने कोलकाता प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तसेच पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा, असं आवाहन त्याने केलं आहे.
'आर कोबे' म्हणजेच हे कधी संपणार? असा त्याचा अर्थ आहे. हे गाणं स्वत: अरिजीतने लिहलं असून कंपोज देखील केलं आहे. गेल्या २४ तासांमध्ये या गाण्याला जवळपास ३.५ लाख इतके व्हूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ साधारण ३ मिनिटांचा आहे.
व्हिडीओच्या कॅप्शनने वेधलं लक्ष-
हा व्हिडीओ शेअर करताना त्याने लिहलेल्या कॅप्शनने चाहत्यांच लक्ष वेधलं आहे. त्यामध्ये अरिजीतने लिहलंय," ९ ऑगस्टच्या दिवशी कोलकाता येथे झालेल्या अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण देश हळहळला. आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे घडलेल्या संतापजनक प्रकारामुळे नागरिकांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे. हे गाणं म्हणजे अन्यायाविरोधात उठवलेला आवाज आहे. शिवाय हे गाणं त्या महिलांसाठी प्रेरणा आहे ज्या निमूटपणे अन्याय सहन करतात".
चाहत्यांनी दिली साथ-
पुढे अरिजीत म्हणाला, "हे फक्त गाणं नाही आहे तर अन्यायाविरोधात लढा देण्यासाठी प्रेरणा देणारं आहे. अरिजीतंच हे नवं गाणं ऐकुन अंगाावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबच या गाण्यातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे, महिलांच्या सुरक्षा आणि सन्मान यासाठी आपली लढाई अजूनही संपलेली नाही", असं देखील त्याने म्हटलं आहे. त्याच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.