Neha Bhasin Viral Post: सुप्रसिद्ध बॉलिवूड आणि पंजाबी गायिका नेहा भसीनने स्वत: च्या सोशल मीडिया अकाउंटवरून तिच्या वैयक्तिक आयुष्यबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे.
नेहा भसीनबॉलिवूडमधील लोकप्रिय गायिकांपैकी एक आहे. दमदार गायन शैली आणि आवाजातील वेगळेपणामुळे नेहा ओळखली जाते. तिने 'स्वॅग से करेंगे सबका स्वागत', 'हीरिए', 'धुनकी', 'मेरा लौंग गवाचा' यांसारख्या गाण्यांना आपला आवाज दिला आहे. तसेच सोशल मीडियावर ती आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे देखील चर्चेत असते. नुकतीच नेहाने ती एक गंभीर आजाराशी झुंज देत असल्याची माहिती तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे.
नेहाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक भली मोठी पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिला प्रीमेन्स्ट्रुअल डिस्फोरिक डिसऑर्डर( पीएमडीडी) आणि ऑब्सेसिव-कम्पल्सिव पर्सनॅलिटी डिसऑर्डर यांसारख्या आजारांनी ग्रासले आहे.
नेहा भसीने या पोस्टमध्ये लिहलंय, "मला तुमच्यासोबत खूप काही बोलायचं आहे ,पण कुठून सुरुवात करु मलाच कळत नाही आहे. गेल्या काही दिवसांपासून मला गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. गेल्या २० वर्षांपूर्वीच मला या आजाराचा त्रास होत आहे. पण वैद्यकिय तपासणीनंतर या आजाराबद्दल आता ते निष्पण्ण झालं आहे. या आजाराबद्दल समजताच माझं मानसिक संतुलन बिघडलं".
शिवाय या पोस्टमध्ये तिने या आजाराच्या लक्षणांबाबतही माहिती दिली आहे. "थकवा, शारिरिक वेदना, मानसिक त्रास, ताणतणाव तसेच चिंता यांसारख्या लक्षणांमुळे मी त्रस्त आहे. यामुळे मला व्यवस्थित झोपही लागत नव्हती, काम करावसं वाटत नव्हतं. गेल्या काही वर्षापासून मी या आजाराशी ठामपणे लढा देत असल्याचंही तिने या पोस्टमध्ये लिहलंय. शिवाय या आजारातून लवकर बरी होण्यासाठी नेहा वेगवेगळ्या थेरीपी तसेच योगासनांचा आधार घेते असंही तिने म्हटलं आहे. ताण-तणावावर नियंत्रण आणण्यासाठी मी जास्त कामही करत नाहीये. यामुळे ज्या लोकांवर प्रेम करते त्यांच्या भेटीगाठी करणं हे सगळं मी करत होते. या सगळ्या गोष्टी आपल्याला आरामदायक वाटतात पण हाच आराम तुम्ही किती थकलेले आहात याची जाणीव करुन देतो. मी या सगळ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते आहे".