Join us

श्रेया घोषालच्या चिमुकल्या बाळाला पाहिलं का? पाहा मायलेकाचा 'हा' सुंदर फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 17:29 IST

Shreya ghoshal: श्रेयाने मे २०२१ मध्ये एका चिमुकल्या बाळाला जन्म दिला. तेव्हापासून या बाळाची झलक पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं पाहायला मिळतं.

आपल्या सुमधूर आवाजाने कानसेनांना तृप्त करणारी लोकप्रिय गायिका म्हणजे श्रेया घोषाल. आजवरच्या कारकिर्दीत श्रेयाने बॉलिवूडला एकाहून एक सरस गाणी दिली. त्यामुळे सोशल मीडियावर तिची कायम चर्चा रंगत असते. सध्या श्रेया करिअरसोबतच तिच्या कुटुंबाकडेही जातीने लक्ष देत आहे. त्यामुळे अनेकदा ती तिच्या कुटुंबासोबतचे काही अविस्मरणीय क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असते. यात तिच्या चिमुकल्या लेकाची चर्चा रंगली आहे.

श्रेयाने मे २०२१ मध्ये एका चिमुकल्या बाळाला जन्म दिला. तेव्हापासून या बाळाची झलक पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं पाहायला मिळतं. यात श्रेयानेही सोशल मीडियावर तिच्या बाळाचे अनेक फोटो शेअर केले आहेत. मात्र, यावेळी तिने शेअर केलेला फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या फोटोमध्ये श्रेयाने तिच्यासोबत बाळाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ही मायलेकाची जोडी दिसून येत आहे.

दरम्यान,५ फेब्रुवारी २०१५ रोजी पार्श्वगायिका श्रेया घोषालने तिचे बालपणीचा मित्र शिलादित्यसोबत लग्न केलं. श्रेया आणि शिलादित्य हे बालपण मित्र असून शिलादित्य Hipcask.com वेबसाइटचे संस्थापक आहेत. श्रेयाने २००२ मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या 'देवदास' चित्रपटातून पार्श्वगायनाच्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात तिने 'सिलसिला ये चाहत का', 'बॅरी पिया', 'छलक छलक', 'मोरे पिया' आणि 'डोला रे डोला' अशी पाच गाणी गायली. यानंतर, तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. 

टॅग्स :श्रेया घोषालसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमा