बॉलिवूड स्टार्सच्या लव्ह अफेअर्सचे एक ना अनेक किस्से सतत चर्चेत असतात. काही जुने किस्से, काही जुन्या प्रेमकहाण्या तर आजही चवीने चघळल्या जातात. बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री काजोल (Kajol) हिच्याबद्दलचा एक किस्साही असाच. होय, काजोलच्या ‘सीक्रेट क्रश’बद्दल फार कमी लोकांना ठाऊक असेल. काजोल व अजय देवगण (Ajay Devgan) प्रेमात पडले. पुढे त्यांनी लग्न केलं. दोघांना दोन मुलं झालीत. आताश: दोघंही आनंदात नांदत आहेत. अजय व काजोल यांना बॉलिवूडचं परफेक्ट कपल मानलं जातं. पण तुम्हाला कदाचित माहित नसेल की, अजयच्या प्रेमात पडण्याआधी काजोल अक्षय कुमारच्या (Akshay Kumar ) प्रेमात वेडी झाली होती. अगदी ती त्याला पार्ट्यांमध्ये शोधत फिरायची.
होय, अक्षयच्या फिटनेस व चार्मिंग लुकने अनेक तरूणींना वेड लावलं होतं. काजोल त्यापैकीच एक होती. त्या दिवसांत अक्षय काजोलचा क्रश होता. अक्कीच्या हँडसम लुकवर ती फिदा झाली होती. इतकी की, फिल्मी पार्ट्यांमध्ये तिची नजर अक्षयलाच शोधत असायची.
काजोलचा जुना मित्र करण जोहर याने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये याचा खुलासा केला होता. काजोलचा अक्षय किती आवडायचा, हे करणने अगदी रंगवून सांगितलं होतं.
त्या दिवशी काजोल अक्षयला शोधत होती...करणने सांगितलं होतं की, ‘हिना’ चित्रपटाची पार्टी होती. या पार्टीत काजोल व मी आम्ही दोघं दुसऱ्यांदा भेटलो होतो. काजोलचा अक्षयवर क्रश होता आणि त्या पार्टीत काजोल अक्षयला शोधत होती. मी अक्षयला शोधण्यात तिची मदत केली होती. आम्ही दोघांनीही अक्षयला शोधलं. अक्षय तर मिळाला नाही पण त्यानिमित्ताने माझी व काजोलची मैत्री झाली. इथून आमच्या मैत्रीची सुरूवात झाली.
अक्षयचा पहिला सिनेमा ‘सौगंध’ रिलीज झाला होता आणि त्याचा पहिलाच सिनेमा पाहून काजोल अक्षयवर भाळली होती. तिला अक्षयसोबत मैत्री करायची होती. अर्थात तिच्या डोक्यावरच अक्षयच भूत काही दिवसांतच उतरलं. अजय देवगणची आयुष्यात एन्ट्री झाली आणि काजोल अक्षयला विसरली. एकंदर काय तर अक्षय व काजोलची लव्हस्टोरी सुरू होण्याआधीच संपली.