Join us

बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारच्या आलिशान घराचे खास फोटोज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2018 12:06 IST

अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना हिने इंडस्ट्री सोडल्यावर इंटेरिअरचं काम सुरु केलंय. तिने तिच्या घराचंही सुंदर इंटेरिअर केलंय. 

(Image Credit: Vogue India)

अक्षय कुमार बॉलिवू़च्या त्या काही निवडक अभिनेत्यांपैकी आहे ज्याला आपलं जीवन साध्या पद्धतीने जगायला आवडतं. अक्षय कुमार हा त्यांच्या शिस्तीसाठीही ओळखला जातो. त्याची ही शिस्त आणि त्याचा निटनेटकेपणा त्याच्या घरातही बघायला मिळतो. अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना हिने इंडस्ट्री सोडल्यावर इंटेरिअरचं काम सुरु केलंय. तिने तिच्या घराचंही सुंदर इंटेरिअर केलंय. 

सकाळी लवकर म्हणजे 4 वाजता उठणं आणि रात्री लवकर झोपणं हे अक्षयचं ठरलेलं आहे. त्याच्या शिस्तीमुळे आणि डाएटमुळेच तो इतका फिट आहे आणि वर्षाला तीन-चार सिनेमे करतो आहे. 

ट्विंकल खन्ना ही स्वत: इंटेरिअर डिझायनर असून ती त्यावर कॉलमही लिहिते. अक्षयचं घर अंधेरी वेस्टला लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये आहे. त्याचं हे आलिशान डुप्लेक्स जुहू बीचसमोर आहे. या घराच्या ग्राऊंड फ्लोरला लिव्हींग एरिया, डायनिंग एरिया, किचन, होम थिएटर आणि अक्षय कुमारचं क्लोजेट आहे. 

हृतिक रोशन हा अक्षय कुमारचा शेजारी आहे. जुहूतील या सी-फेस बिल्डींगमध्ये दोघांचं आलिशान घर आहे. या घराला आकर्षक करण्यासाठी अनेक महागड्या वस्तू,, महागड्या मुर्त्या वापरण्यात आल्या आहेत. लहान मुलांचा विचार करुनही या घरात अनेक गोष्टी करण्यात आल्या आहेत.  

टॅग्स :अक्षय कुमारबॉलिवूड