Join us

अंडरवर्ल्ड कनेक्शन अन् पतीवर जीवघेणा हल्ला; लग्नानंतर कुठे गायब झाली 'त्रिदेव' फेम अभिनेत्री, जगतेय एकाकी आयुष्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 14:13 IST

यश चोपडा यांच्या 'विजय' या सिनेमातून अभिनेत्री सोनम खानने हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं.

Sonam Khan Industry Journey : 'तिरछी टोपी वाले'... हे ९० च्या दशकातील गाजलेलं गाणं. आजही सिनेरसिकांमध्ये या गाण्याची क्रेझ पाहायला मिळते. या गाण्यामुळे अभिनेत्री सोनम खानला रातोरात प्रसिद्धी मिळाली. शिवाय 'त्रिदेव' सिनेमा तिच्या करिअरला कलाटणी देणारा ठरला. 

यश चोपडा यांच्या 'विजय' या सिनेमातून तिने हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. १९९८ मध्ये हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. पण 'त्रिदेव' या चित्रपटामुळे ती खरी प्रसिद्धीझोतात आली. 'त्रिदेव' मधील 'ओए ओए' तसेच 'तिरछी टोपी वाले' यांसारख्या गाण्यांमुळे तिला चांगलाच स्टारडम मिळाला. त्यानंतर सोनमला एका पेक्षा एक चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या. त्यावेळेस सोनम खानने माधुरीसह असंख्य बॉलिवूड नायिकांच्या अभिनयात टक्कर दिली होती. सोनम तिच्या बोल्ड लूकमुळे त्याकाळी चर्चेत होती. बॉलिवूडसह तिने तेलगू सिनेमातही आपलं नशीब आजमावलं.पण, अचानक यशाच्या शिखरावर असताना सोनमने इंडस्ट्रीला रामराम केला. यामागे अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचं सांगितलं जातं.

मीडिया रिपोर्टनुसार, अंडरवर्ल्ड गॅंगस्टर अबू सालेमसोबत तिचं नाव जोडलं गेलं. त्याच दरम्यान, काही गॅंगस्टर्सकडून अभिनेत्रीवर दबाव टाकण्यात येत होता. त्यामुळे १९९७ मध्ये तिने भारत देश सोडण्याचा निर्णय घेतला. कारण त्याच वेळेस सोनमच्या नवऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. शिवाय हा हल्ला अबु सालेमने केल्याचं सांगण्यात येतं. 

त्यानंतर सोनम सहकुटुंब परदेशात स्थायिक झाली. याच कारणामुळे तिचे घरचे संबंध बिघडले. त्यामुळे काही वर्षातच सोनम तिच्या पतीपासून विभक्त झाली. १५ वर्षांच्या सुखी संसारानंतर तिने घटस्फोट घेत आपल्या नात्याला पूर्णविराम दिला. सध्या अभिनेत्री एकाकी आयुष्य जगते आहे. 

वर्कफ्रंट- 

अभिनेत्री सोनम खानने चंकी पांडे, चिरंजीवी तसेच नसीरुद्दीन शाह यासांरख्या नावाजलेल्या नायकांबरोबर काम केलं आहे. अभिनेत्रीने 'मिट्टी और सोना', 'आखिरी गुलाम', 'लश्कर', 'क्रोध', 'अजूबा', 'विश्वात्मा' यांसारखे सुपरहिट चित्रपट इंडस्ट्रीला दिले. मीडिया रिपोर्टनुसार,१९८८ ते १९९४ या ६ वर्षांच्या कालावधीत तिने ३० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

टॅग्स :बॉलिवूडसोनमसिनेमासेलिब्रिटी