भारतीय हवाई दलातील ट्रेनिंग सोडून फिल्मी इंडस्ट्रीत दाखल झालेले ज्येष्ठ अभिनेते रंजीत यांचा आज वाढदिवस. मोठ्या पडद्यावर खलनायकाच्या भूमिकांमुळे नावारूपास आलेल्या रंजीत यांनी पाचशेवर सिनेमांत काम केले. 70 व 80 च्या दशकात अनेक सिनेमांत त्यांनी रेपिस्टचे रोल केलेत. याचा परिणाम असा की, ख-या आयुष्यात मुली त्यांना घाबरायला लागल्या होत्या. इतकेच नाही तर चित्रपटातील त्यांचा निगेटीव्ह रोल पाहून त्यांच्या स्वत:च्या आईने त्यांना घराबाहेर काढले होते.
खरे नाव गोपालअभिनेता रंजीत यांचे खरे नाव गोपाल बेदी आहे. मग रंजीत हे नाव त्यांनी का ठेवले तर सुनील दत्त यांच्यामुळे. हो, गोपाल हे नाव खूपच कॉमन वाटल्याने सुनील दत्त यांनी त्यांचे ‘रंजीत’ असे नामकरण केले.
ख-या आयुष्यात शुद्ध शाकाहारीरंजीत यांनी अनेक सिनेमांत खलनायकाच्या भूमिका साकारल्या. अनेक चित्रपटात त्यांना मद्यपी दाखवण्यात आले आहे. पण ख-या आयुष्यात रंजीत दारू, सिगारेटला स्पर्शही करत नाहीत. शिवाय ते शुद्ध शाकाहारी आहेत.
रंजीत यांच्या प्रेमात वेडी होती सिंपल
डिंपल कपाडियाची बहिण सिंपल कपाडिया रंजीत यांच्या प्रेमात अक्षरश: वेडी होती. आज सिंपल या जगात नाही. ही सिंपल रंजीत यांच्या प्रत्येक अदांवर फिदा होती. मग त्यांची हेअर स्टाईलपासून त्यांची बोलण्याची स्टाईल. मात्र या प्रेमकथेत एक ट्विस्टही होता. सिंपल कपाडियाचे जीजू म्हणजेच राजेश खन्ना या लव्हस्टोरीतील व्हिलन ठरले होते. राजेश खन्ना मेव्हणीच्या बाबतीत खूप पजेसिव्ह होते. राजेश खन्ना यांना रंजीत अजिबात आवडत नव्हते. सिंपल व रंजीत यांची वाढती जवळीक त्यांना सहन होत नव्हती. ‘छैला बाबू’ या सिनेमाच्या सेटवर सिंपलमुळे राजेश खन्ना व रंजीत यांच्यातील मोठे भांडण झाले होते. इतके की, रागाच्या भरात राजेश खन्ना रंजीत यांना मारायला गेले होते. काळासोबत रंजीत व सिंपल यांचे नाते संपुष्टात आले. पुढे तर 2009 साली कर्करोगामुळे सिंपल कपाडिया जग सोडून गेली.