Join us

बॉलीवूड चले हम !

By admin | Published: July 03, 2016 2:34 AM

अमृता सुभाषनं ‘रमन राघव 2.0’ या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दिकीच्या बहिणीची भूमिका साकारली आहे. याच कसदार आणि दमदार भूमिकेमुळं अमृतानं अवघ्या बॉलीवूडचं लक्ष आपल्याकडे

अमृता सुभाषनं ‘रमन राघव 2.0’ या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दिकीच्या बहिणीची भूमिका साकारली आहे. याच कसदार आणि दमदार भूमिकेमुळं अमृतानं अवघ्या बॉलीवूडचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलंय. आगामी काही दिवसांत अमृताचे एक-दोन नाही तर तब्बल तीन हिंदी सिनेमे रसिकांच्या भेटीला येणार आहेत. आगामी काळात बड्या बड्या दिग्दर्शकांसोबत अमृता काम करणार आहे.. तिच्या आगामी हिंदी सिनेमाविषयी सीएनएक्सने अमृता सुभाषशी साधलेला हा संवाद.प्रश्न : आजवर तू अनेक भूमिका गाजवल्या. त्यात फुलराणीचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. मात्र तुझी अभिनेत्री बनण्याची सुरुवात नेमकी कशी झाली?घरातच तसं अभिनयाचं शिक्षण लहानपणापासून मिळत होतं. नॅशनल स्कूल आॅफ ड्रामामधून मी अभिनयाचं शिक्षण घेतलं सत्यदेव दुबेंची मी विद्यार्थिनी होती. त्यांच्याकडून मला खूप शिकायला मिळाल जे मी कधीही विसरू शकणार नाही. मी आतापर्यंत केलेल्या माझ्या भूमिकांचं श्रेय मी माझी आई आणि दुसरं सत्यदेव दुबे यांना देते. ती फुलराणी असो किंवा देवराई, गंध, श्वास, वळू, विहीर, किल्ला यांसारख्या अनेक मराठी सिनेमात माझ्या भूमिकांच कौतुक झालं. सगळ्यांचं प्रेम, आशीर्वाद यामुळेच बॉलीवूडमध्येही पदार्पण करू शकली. ‘रमन राघव 2.0’ या माझ्या पहिल्या हिंदी सिनेमात भूमिका छोटी असली तरी त्या भूमिकेचं सिनेमाच्या दृष्टीनं फार महत्त्व होतं असं वाटतं. माझ्या दृष्टीने भूमिका किती मोठी हे महत्त्वाचं नसून तिचा दर्जा कसा आहे हे महत्त्वाचं आहे.प्रश्न : रमन राघवनंतर आगामी काळात तुझे कोणते हिंदी चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहेत?आगामी काळात मी प्रमुख भूमिका साकारताना दिसेन. माझे तीन हिंदी सिनेमा येणार आहेत. आयर्लंड सिटी, चिड़ीयाँ आणि अल्बर्ट आईनस्टाईन बनना चाहता हुँ, प्रश्न : तुझ्या मराठी चित्रपटांप्रमाणे हिंदी सिनेमेही सामाजिक संदेश देणारे असतील का? हो, अगदी बरोबर. मी कोणताही सिनेमा स्वीकारण्याआधी त्याचा अभ्यास करतेय. माझ्या भूमिकेतून योग्य मेसेज रसिकांपर्यंत पोहोचावा असं मला नेहमी वाटतं. त्याच दृष्टीनं काम करण्याचा माझा कल असतो. नक्कीच आगामी सिनेमे हे माझे असेच चांगले संदेश देणारे आहेत. रसिकांनाही हे सिनेमे आवडतील याची मला खात्री आहे. प्रश्न : या तिन्ही सिनेमांविषयी तुझ्या चाहत्यांना काय सांगशील? सगळंच आता सांगता येणार नाही, मात्र तरीही वरील दोन हिंदी सिनेमांत मी विनय पाठकची नायिका साकारणार आहे. त्यात मोठी भूमिका मिळालीय. त्यामुळे जे रसिक रमन राघव सिनेमांतील माझ्या छोट्याशा भूमिकेमुळे माझ्यावर नाराज झाले आहेत, त्यांना नक्कीच हे सिनेमे पाहिल्यावर आनंद होईल. एक चांगला सिनेमा पाहिल्याचा आनंद त्यांना मिळेल. रसिक सिनेमा पाहून थिएटरबाहेर पडताना चांगला संदेश घेऊन बाहेर पडतील हे नक्की.

- suvarna.jain@lokmat.com