१ कोटींवर लोकांनी पाहिला ‘तृतीयपंथियाचा बदला’! साऊथच्या ‘या’ चित्रपटाची युट्यूबवर धूम!!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2018 3:40 PM
साऊथच्या डब चित्रपटांना युट्यूबवर जबरदस्त फॅन फॉलोर्इंग आहे. भडक कथा आणि त्यालाच साजेशी अॅक्शन यामुळे या चित्रपटांना बॉलिवूडपेक्षाही अधिक पसंत केले जाते. सध्या साऊथचा एक असाच चित्रपट युट्यूबवर ट्रेंड करतो आहे.
साऊथच्या डब चित्रपटांना युट्यूबवर जबरदस्त फॅन फॉलोर्इंग आहे. भडक कथा आणि त्यालाच साजेशी अॅक्शन यामुळे या चित्रपटांना बॉलिवूडपेक्षाही अधिक पसंत केले जाते. सध्या साऊथचा एक असाच चित्रपट युट्यूबवर ट्रेंड करतो आहे. हा चित्रपट पाहणा-या लोकांची संख्या कोट्यवधीवर पोहोचली आहे. युट्यूब ट्रेंडिंग मध्ये टॉप २० मध्ये स्थान मिळवलेल्या या चित्रपटाचे नाव आहे, ‘अर्धनारी’. आत्तापर्यंत एक कोटींपेक्षा अधिक लोकांनी हा चित्रपट पाहिला आहे.‘अर्धनारी’ ही एका सीरिअल किलरची कथा आहे. एका ट्रान्सजेंडर अर्थात तृतीय पंथियाची ही कथा. जो, आपल्या अत्याचाराचा सूड उगवण्यासाठी एकापाठोपाठ एक असे अनेक खून करतो. २०१६ मध्ये हा तेलगू चित्रपट रिलीज झाला होता. अर्थात दक्षिणेच्या बॉक्सआॅफिसवर या चित्रपटाला फार चमक दाखवता आली नव्हती. त्यामुळे चित्रपटाने सरासरी बिझनेस केला होता. पण युट्यूबवर हा चित्रपट प्रचंड हिट ठरतो आहे. भानूशंकर चौधरी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केलेला आहे. अर्जुन यजत यात लीड रोलमध्ये आहे आणि त्याने साकारलेला जिवंत अभिनय अंगावर रोमांच उभे करणारा आहे. ही अर्जुन नामक युवकाची कथा आहे, जो पुढे ‘अर्धनारी’ बनून समोर येतो. ‘अर्धनारी’ दिवसा झोपते आणि रात्री आपले काम करते. झोप येऊ नये म्हणून ही ‘अर्धनारी’ स्वत:ला विंचवांचा डंख मारून घेते. ती ज्याप्रमाणे हत्या करते, ते पाहून अंगावर काटा येतो. सरतेशेवटी ही ‘अर्धनारी’ पकडली जाते. पण तिने इतके खून का केलेत, हे जेव्हा समोर येते, तेव्हा सगळेच हैरान होतात.