देशभरात निवडणुकीचे वातावरण असून यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काही कलाकार राजकीय पक्षात सामील झालेत तर काही सोशल मीडियावर प्रचार करत आहेत. तर काही कलाकार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जनजागृती करत आहेत. त्यात बॉलिवूडमधील काही स्टारकिड पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
या यादीत सर्वात पहिले नाव आहे ते शाहरूख खानची मुलगी सुहानाचे. सुहानाचा जन्म २२ मे, २००० मध्ये झाला असून ती १८ वर्षांची झाली आहे. ती यंदा पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावणार आहे.
इब्राहिम अली खान
सारा अली खानचा छोटा भाऊ इब्राहिम अली खानदेखील १८ वर्षांचा झाला आहे. २००१ मध्ये इब्राहिमची जन्म झाला असून तो देखील यावेळी मतदान करणार आहे.
२२ वर्षीय जान्हवी कपूरचे देखील या यादीत नाव आहे आणि तीदेखील पहिल्यांदा मतदान करणार आहे. जान्हवीचा जन्म ६ मार्च, १९९७साली झाला असून जान्हवीने ईशान खट्टरसोबत धडक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.
निर्वाण खान
सलमान खानचा पुतण्या व सोहेल खानचा मुलगा निर्वाण १८ वर्षांचा झाला आहे. १५ डिसेंबर २००० साली निर्वाणचा जन्म झाला असून तो देखील यावेळी मतदानाचा हक्क बजावणार आहे.
नव्या नवेली
अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेलीदेखील पहिल्यांदा मतदान करणार आहे. नव्याचा जन्म १९९७मध्ये झाला असून आता ती २२ वर्षांची आहे.
आर्यन खान
शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानदेखील पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहे. आर्यनचा जन्म १३ नोव्हेंबर, १९९७ साली झाला असून आता तो २१ वर्षांचा आहे.
वीस वर्षीय अनन्या पांडे यंदा मतदान करणार आहे. यावर्षी ती स्टुडंट ऑफ द ईयर २ चित्रपटातून बॉ़लिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
इरा खान
आमीर खानची बावीस वर्षीय मुलगी इरा खानदेखील मतदानाचा हक्क बजावणार आहे.
खुशी कपूर
जान्हवी कपूरची छोटी बहिण खूशी कपूरदेखील पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीत मतदान करणार आहे. खुशीचा जन्म ५ नोव्हेंबर, २००० साली झाला असून तीदेखील लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल.
सनाया कपूर
३ नोव्हेंबर, १९९९ साली संजय कपूरची मुलगी सनाया कपूरचा जन्म झाला. १९ वर्षीय सनाया यंदा पहिल्यांदा मतदान करणार आहे.