गीतांजली आंब्रे
फ्रीडा पिंटो एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात स्लमडॉग मिलेनियर सिनेमातून केली. यासिनेमाला सर्वोत्तम अॅकेडमी पुरस्कार मिळाला होता. यात तिने लतिका नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. फ्रीडाने अनेक इंटरनॅशनल अॅवॉर्डचे अँकरिंग केले आहे. नुकताच तिचा 'लव्ह सोनिया' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे या सिनेमाच्या निमित्ताने तिच्याशी केलेली ही बातचीत.
या सिनेमातील भूमिका साकारण्यासाठी तू कशा पद्धतीने रिसर्च केलेस ?लव्ह सोनियाचे दिग्दरर्शक तरबेज नूरानी यांना हा सिनेमा वास्तवादी ठेवायचा होता. सगळ्यात जास्त रिसर्च या सिनेमासाठी आमच्या पैकी मृणाल ठाकूरने केले आहे. ती कोलकत्ता जाऊन काहीकाळ वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसोबत राहिली. मी दहा वर्षा आधी रिसर्च केले होते. कारण गेल्या दहा वर्षांपासून मी तरबेज नूरानीच्या स्लमडॉग मिलेनियरपासून संपर्कात आहे. त्यांनी माझ्याकडे यासिनेमाची स्क्रिप्ट दिली आणि म्हणाले मला या सिनेमाचे दिग्दर्शन करायचे आहे. त्या आधी त्यांने पाच वर्ष या विषयावर रिसर्च केले होते. मी स्क्रिप्ट वाचल्या वाचल्या होकार दिला होता. लव्ह सोनियाची स्क्रिप्ट मी 2007 मध्ये वाचली होती आणि आज 2018 आहे जवळपास 11 वर्ष झाली या गोष्टीला मात्र अजूनही देह विक्री करणाऱ्या महिलांच्या परिस्थिती कोणताच बदल झालेले नाही, ती आजही तितकीच भीषण आहे. मी आपार्यंत पाहिलेल्या मानवी तस्करीबाबतच्या सिनेमांमध्ये मला लव्ह सोनिया सगळ्यात जास्त वास्तवादी वाटतोय.
स्लमडॉग नंतर तुला काहीकाळ स्वत:ला हरवल्यासारखे का वाटत होते ?माझ्याकडे काम नव्हते म्हणून मला हरवल्यासारखे वाटत नव्हते कारण माझ्याकडे खूप काम होते म्हणून मला असे वाटत होते. खरं तर मला अनेक सिनेमांच्या ऑफर येत असल्याने खुश व्हायला हवे होते मात्र ते सिनेमा करण मला पटत नव्हते त्यात माझा आवाज कुठेच नव्हता. मला आवडतील अशा भूमिका त्या नव्हता मग मी काहीकाळ ब्रेक घ्यायचे ठरवले आणि जवळपास अडीच वर्षे मी काम केले नाही. मला माहिती होते एका अभिनेत्रीच्या करिअरच्या दृष्टीने सिनेमातून ब्रेक घेणे इतके सोपे नव्हते मात्र मी तो घेतला आणि आज मी माझ्या निर्णयावर आनंदी आहे.
तू बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये काम केले आहेस तर बॉलिवूड सिनेमा जेव्हा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसाठी परदेशात येतात तेव्हा त्यांना मिळणारा प्रतिसाद कसा असतो ?बॉलिवूडचे सिनेमा आपली छाप सोडण्यात यशस्वी झाले आहेत आतापर्यंत. तसेच आता इकडच्या सिनेमांमधील संवेदनशीलता सुद्धा बदलत चालली आहे. फक्त मसालेदार सिनेमा आपण तयार करत नाहीत. मसान सारखे सिनेमासुद्धा आपल्याकडे बनतात. गेल्या 10 ते 12 वर्षांपासून मी हॉलिवूडमध्ये हेच सांगतेय की आम्ही फक्त मसाला सिनेमा तयार करत नाहीत तुम्हाला स्मिता पाटील किंवा शबाना आझमी यांचे सिनेमा बघायला पाहिजेत.
स्लमडॉग मिलेनियरपासून सुरु झालेला हा तुझा प्रवास आज मागे वळून बघताना तुला कसा वाटतो ?माझ्यात अनेक बदल झाले, 10 वर्षांपूर्वी माझ्यात आत्मविश्वास होता मात्र मी बिनधास्त नव्हते. पण आज लोक काय बोलतील या गोष्टीचा जराही विचार करत नाही मला जे हवंय तेच मी करते. माझ्यासाठी मी प्रोफेशनल ग्रोथ मला माझ्या पर्सनल ग्रोथ ऐवढीच महत्त्वाची आहे. प्रत्येक सिनेमामधून मी काही तरी शिकले आहे आणि आज मी जी काही आहे त्याबाबत मी समाधानी आहे.